टाकाऊपासून टिकाऊ, निमंत्रण पत्रिकांपासून बनवा आकर्षक फ्लॉवर पॉट

Last Updated:
आकर्षक निमंत्रण पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून खास वस्तू बनवून आपलं घर सजवता येऊ शकतं.
1/6
आपल्याकडे एखादा कार्यक्रम, विवाह सोहळा यांच्या निमंत्रण पत्रिका खूप आकर्षक बनवल्या जातात. पण नंतर या पत्रिका कचऱ्यातच जातात. पण याच पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून खास वस्तू बनवून आपलं घर सजवता येऊ शकतं.

advertisement
2/6
 <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील कलाकार निखिल सुशीला मोरेश्वर यांनी याच पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून आकर्षक फ्लॉवर पॉट कसा बनवायचा? हे दाखवलं आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची ही कल्पना आपल्यालाही नक्कीच आवडेल.

3/6
आता त्याच डिजाईनच्या पत्रिकेचा तुकडा घेऊन गोल आकारात कापून घ्या. सेंटरपर्यंत कात्रीने कट करा. आता थोडं दुमडून स्टेपलर पिन लावून घ्या. आता त्यावर फेविकॉल किंवा हॉट ग्लु च्या साह्याने कोन चांगला चिटकवून घ्या.

4/6
आता फुलं बनविण्यासाठी सर्वप्रथम पत्रिका आयताकृती कापून त्याला दुमडून पेन्सिलने मार्क करा. बारीक बारीक लांब कट करून घ्या. आता उलट करून एकीकडे फेविकॉल लावून घ्या.

5/6
आता तयार केलेल्या दांडीवर वरून खाली अशाप्रकारे चिटकवून घ्या. अशी 4-5 फुले तयार करा आणि वेगवेगळ्या आकाराची फुले तुम्ही तयार करू शकता. आता त्या फ्लॉवर पॉट ला डेकोरेशन करू शकता. त्यात ही फुले ठेवून फ्लॉवर पॉट तयार आहे.

6/6
कागदी पुठ्ठ्यांचा हा सुंदर फ्लॉवर पॉट अवघ्या अर्धा तासात बनून तयार होतो. अशाच अनेक आकर्षक दिसणाऱ्या पत्रिका टाकून देण्यापेक्षा कोणाला तरी भेट म्हणून देण्यासाठी किंवा घरी शोभेची वस्तू म्हणून ठेवण्यासाठी विविध वस्तू आपण तयार करू शकतो. (अमिता शिंदे, प्रतिनिधी)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement