Iran War: अमेरिकेचा इराणवर स्ट्राईक पण टेन्शन भारताचं वाढलं! अब्जावधींची गुंतवणूक पाण्यात जाण्याची भीती, नेमकं कारण काय?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Iran War: अमेरिका-इराण युद्धाने आता अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदर क्षेत्रातील लष्करी तळांवर भीषण बॉम्बफेक केली असल्याचे समोर आले आहे.
US Airstrike On Iran : अमेरिका-इराण युद्धाने आता अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदर क्षेत्रातील लष्करी तळांवर भीषण बॉम्बफेक केली असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या या भागात झालेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण आखातात खळबळ उडाली असून, भारताच्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीवरही टांगती तलवार निर्माण झाली आहे.
डोंगररांगांमधील गुप्त तळांना लक्ष्य
'वॉइस ऑफ अमेरिका' आणि 'अल जझीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन फायटर जेट्सनी चाबहार व्यापारी क्षेत्राच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराळ भागाला लक्ष्य केले. येथे इराणच्या 'कुद्स फोर्स'चे (Quds Force) भूमिगत तळ आणि शस्त्रागारे असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर चाबहार परिसरात प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. विशेष म्हणजे, ११ मार्च रोजी देखील याच भागातील आयआरजीसीच्या (IRGC) नौसैनिक तळांवर हल्ला झाला होता, त्यानंतर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.
advertisement
अमेरिकेकडून चाबहार लक्ष्य का?
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करून जागतिक तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने चाबहारवर हल्ला केल्याचे मानले जात आहे.
चाबहार हे इराणचे एकमेव बंदर आहे ज्याचा थेट संपर्क हिंद महासागराशी येतो. येथूनच इराण आफ्रिकी आणि आशियाई देशांतील आपल्या समर्थक संघटनांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो.
advertisement
चाबहारवर हल्ला करून अमेरिका इराणची पर्यायी पुरवठा साखळी आणि लष्करी रसद तोडण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतासाठी धोक्याची घंटा?
चाबहारमधील हा हल्ला भारतासाठी अत्यंत संवेदनशील आहे. भारताने येथील 'शहीद बेहश्ती' टर्मिनलमध्ये मोठी गुंतवणूक केली असून, हा मार्ग भारतासाठी अफगाणिस्तान आणि मध्य आशियाचे प्रवेशद्वार आहे. जर अमेरिकेचे हल्ले थेट बंदर क्षेत्रापर्यंत पोहोचले, तर भारताच्या 'इंटरनेशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर'ला (INSTC) मोठा फटका बसू शकतो. मात्र, सध्याचे हल्ले बंदरापासून काही अंतरावर असलेल्या लष्करी तळांवर झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 16, 2026 1:50 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: अमेरिकेचा इराणवर स्ट्राईक पण टेन्शन भारताचं वाढलं! अब्जावधींची गुंतवणूक पाण्यात जाण्याची भीती, नेमकं कारण काय?








