advertisement

मैदानाचा 'बादशाह' अन् घराचा 'लेक' गेला, मालकानं केलं असं काही, अख्खं गाव हळहळलं

Last Updated:
"तो बैल नव्हता, माझा मुलगा होता," असं म्हणताना गणेश जगनाडे यांचा कंठ दाटून येतो. शंकरपटाच्या मैदानात जेव्हा हा बैल गळ्यात घुंगरांच्या माळा घालून उभा राहायचा, तेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या पोटात गोळा यायचा. आज तो गोठा रिकामा झाला आहे, मैदानातील ती वेगवान धाव थांबली आहे.
1/7
ज्यानं आयुष्यभर साथ दिली, आयुष्याचं सोनं केलं आणि एक दोन नाही तब्बल 16 शर्यती जिंकवून दिल्या, अशा लाडक्या बैलानं जगाचा निरोप घेतला आणि मालकाच्या काळजात धस्स झालं. डोळ्यातून अश्रू वाहात होते, तो शांत झोपला होता आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवून मनातली सल, दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता सारं काही फक्त अश्रू बोलत होते. तो फक्त बैल नव्हता तर कुटुंबाचा हक्काचा एक भाग झाला होता.

2/7
मैदानात धुरळा उडवून विजयाचा गुलाल उधळणारे पाय कायमचे शांत झाले होते. समोर तो 'वाघ' शांत झोपला होता, पण त्याचा मालक मात्र आतून कोसळला होता. ज्यानं १६ वेळा गुलालाची उधळण केली, त्याला गुलाल लावून निरोप देताना मालकाच्या हातांनाही थरकाप सुटला होता. त्याच्या अंत्यसंस्कारापासून ते दिवसकार्यापर्यंत अगदी सुरळीत कुटुंबियांनी पार पडलं.

3/7
जीवाभावाच्या बैलासाठी त्याच्या मृत्युनंतर त्याचं बारावं आणि तेरावं घालण्यात आलं. ही घटना आहे  भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा इथली. ज्या बैलानं वाऱ्याच्या वेगाला मागं टाकून १६ वेळा गुलाल उधळला, मालकाची मान अभिमानानं उंच केली, त्याच बैलाच्या जाण्याचं दुःख पचवणं गणेश जगनाडे यांना शक्य नव्हतं. अखेर, आपल्या या लाडक्या 'मित्राला' त्यांनी चक्क माणसाप्रमाणे 'तेरवी' घालून अखेरचा निरोप दिला.

4/7
त्यांच्या या अनोख्या प्रेमानं संपूर्ण गाव गहिवरलं. गणेश जगनाडे यांची 'चंद्री' नावाची बैलजोडी म्हणजे गावात एकदम प्रसिद्ध होती. शंकरपटाच्या मैदानात जेव्हा ही जोडी उतरायची, तेव्हा धुरळा उडायचा आणि श्वास रोखून धरला जायचा. या जोडीतील एक बैल नुकताच अल्पशा आजाराने दगावला. पण हा जगनाडे यांच्यासाठी केवळ गोठ्यातला प्राणी नव्हता. १६ मोठ्या शंकरपटांमध्ये या बैलाने विजय मिळवून दिला होता.

5/7
बैल गेला आणि जगनाडे यांच्या घरात जणू घरात स्मशान शांतता पसरली. ज्या बैलाने आपल्याला आयुष्यभर सुख-समृद्धी दिली, त्याला असं उघड्यावर कसं सोडायचं? हा प्रश्न गणेश यांच्या मनात होता. त्यांनी मनाशी पक्कं केलं आणि आपल्या घरातल्या एखाद्या माणसाप्रमाणेच या बैलाचे पुढचे विधी करायचं ठरवलं.

6/7
दहावा-तेराव्याचा विधी झाला आणि बैलाच्या स्मरणार्थ रीतसर तेरव्याचं जेवण आयोजित करण्यात आलं. गावकऱ्यांना निमंत्रण गेलं आणि अख्खं गाव या लाडक्या बैलाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जगनाडे यांच्या घरी गोळा झालं. मुक्या प्राण्याबद्दलचं हे अफाट प्रेम पाहून उपस्थितांच्या पापण्याही ओलावल्या.

7/7
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे रक्ताची नाती दुरावत चालली आहेत, तिथे एका प्राण्यावर मुलासारखं प्रेम करणारा हा मालक गावात नाही तर गावाबाहेरही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्यातलं अनोखं प्रेम पाहून गावकरी देखील भावुक झाले.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement