पुण्यात बीआरटी मार्गातच राडा! दुचाकीस्वारानं पीएमपी चालकाला आधी बाहेर खेचलं मग डोक्यात घातला दगड अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
बीआरटी मार्गामध्ये शनिवारी सायंकाळी एका माथेफिरू दुचाकीस्वाराने पीएमपी चालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर एक संतापजनक घटना घडली. बीआरटी मार्गामध्ये शनिवारी सायंकाळी एका माथेफिरू दुचाकीस्वाराने पीएमपी चालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला असून पर्वती पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश विठ्ठल गुंठे (वय ४०, रा. कात्रज) हे पीएमपी बस घेऊन बीआरटी मार्गातून जात होते. सायंकाळी सहाच्या सुमारास लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात मन्सूर गफूर शेख (वय २४, रा. बिबवेवाडी) हा दुचाकीस्वार देखील नियमबाह्यपणे बीआरटी मार्गातून प्रवास करत होता. यावेळी झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर पुढे भीषण हाणामारीत झाले.
advertisement
भररस्त्यात धुमाकूळ
आरोपी मन्सूर शेखने संतापून आपली दुचाकी थेट बससमोर आडवी लावली. त्याने चालक गुंठे यांना बसबाहेर खेचून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता आरोपीने रस्त्यावरील दगड उचलून गुंठे यांच्या डोक्यात मारला. यात ते जखमी झाले. या झटापटीत चालकाचा मोबाईल फोडण्यात आला आणि त्यांच्या गळ्यातील चांदीची साखळीही आरोपीने तोडून टाकली.
advertisement
या हिंसक कृत्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. चालक गुंठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पर्वती पोलिसांनी मन्सूर शेख विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 1:40 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात बीआरटी मार्गातच राडा! दुचाकीस्वारानं पीएमपी चालकाला आधी बाहेर खेचलं मग डोक्यात घातला दगड अन्...









