Masala Tea : चहा बनवायला फक्त 5 मिनिटं, 'या' सोप्या ट्रिकने बनवा हॉटेलसारखा कडक 'मसाला चहा', ही घ्या रेसिपी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मसाला चहा घरी बनवणं अनेकांना अशक्य वाटतं कारण टपरी सारखा चहा घरी बनतच नाही. पण काळजी करु नका आम्ही तुम्हाला मसाला चहा पर्फेक्ट कसा बनवायचा. त्याची चव कशी मेन्टेन ठेवायची हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं काम एकदम हलकं होईल.
थंडीच्या दिवसात सकाळ झाली की अनेकांना मसाला चहा पिण्याची इच्छा होते, यामुळे ताजेतवाणे तर वाटतेच पण हे एखाद्या एनर्जी ड्रिंक सारखं काम करतं. थंडीत अनेकदा सकाळी अचानक घसा दुखतो किंवा सकाळी उठल्यावर सर्दी जाणते, अशात हा मसाला चहा प्यायल्या चांगला आराम मिळतो. त्यामुळे लोक चांगला आणि कडक असा मसाला चहा पिणं पसंत करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्टेप-बाय-स्टेप रेसिपी:हा मसाला एकदा बनवून ठेवला की तुम्ही महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ वापरू शकता.1. साहित्य भाजून घ्या (Roasting):गॅसवर एक कढई गरम करा आणि त्यात सुंठ, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी मंद आचेवर ३-४ मिनिटे हलके भाजून घ्या. मसाल्यांचा सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा.टीप: वेलची आणि जायफळ जास्त भाजण्याची गरज नाही, कारण त्यांचा नैसर्गिक सुगंध टिकून राहणे महत्त्वाचे आहे.
advertisement
2. थंड करा:भाजलेले सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम मसाले मिक्सरमध्ये वाटल्यानंतर त्यांचा वास उडून जातो.3. थंड झाल्यावर भाजलेले मसाले, वेलची आणि जायफळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्या. हाताने चेक करा, मसाला एकदम बारीक पावडर होईपर्यंत दळून घ्या.4. हा तयार झालेला मसाला हवाबंद काचेच्या बरणीत (Air Tight Jar) भरून ठेवा. त्यामुळे त्याचा सुगंध आणि ताजेपणा दीर्घकाळ टिकून राहतो.
advertisement
advertisement
advertisement
एका भांड्यात पाणी आणि चहा पावडर एकत्र करून गॅसवर ठेवा.पाण्याला उकळी आल्यावर त्यात पाव चमचा तयार केलेला चहा मसाला घाला.मसाला घातल्यानंतर मिश्रण २-३ मिनिटे चांगले उकळू द्या, जेणेकरून मसाल्याचा अर्क पाण्यात उतरेल.आता त्यात दूध आणि साखर घाला. मंद आचेवर चहा 2-3 वेळा उकळी येऊ द्या, ज्यामुळे चहाला छान रंग आणि चव येईल. गरमागरम मसाला चहा गाळून घ्या आणि त्याचा आनंद घ्या.
advertisement
मसाला चहा पिण्याचे फायदे-सर्दी-खोकल्यात आराम: मसाल्यांमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सर्दी आणि घसादुखी कमी करण्यास मदत करतात.-पचन सुधारते: आल्यामुळे (सुंठ) पचनाची क्रिया सुधारते.-रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते: लवंग आणि दालचिनीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.-तणाव कमी होतो: मसाल्यांचा सुगंध मन शांत आणि ताजेतवाने करतो.


