Rakshabandhan 2025: पारंपरिक अन् ट्रेंडी राखी खरेदी करायचीये? मुंबईतले स्वस्तात मस्त 5 मार्केट

Last Updated:
Rakshabandhan: यावर्षी 9 ऑगस्ट (शनिवार) रोजी हा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध बाजारांमध्ये राखी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
1/7
बहीण आणि भावाच्या नात्यातील जिव्हाळा अधोरेखित करणारा रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यावर्षी 9 ऑगस्ट (शनिवार) रोजी हा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध बाजारांमध्ये राखी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. भव्य होलसेल मार्केटपासून स्थानिक स्ट्रीट स्टॉल्सपर्यंत, मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात आकर्षक आणि विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असतात.

advertisement
2/7
मुंबईती प्रसिद्ध बाजारांमध्ये केवळ स्थानिक लोकच नाही तर पर्यटक देखील गर्दी करतात. मुंबईतील विविध बाजारांमध्ये पारंपारिक राखी, इको-फ्रेंडली राखी, शाही डिझायनर राखी, चांदीची राखी अशा अनेक प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत.

3/7
दादर मार्केट: या मार्केटमध्ये रंगीबेरंगी राख्या आणि गिफ्ट आयटम्स अतिशय स्वस्त दरात उपलब्ध असतात. याठिकाणी तुम्ही आपल्या आवडीनुसार राखीचे डिझाइन आणि आकार निवडू शकता. काही दुकानांमध्ये कस्टमाईज आणि पर्सनलाइज्ड राख्या देखील उपलब्ध आहेत.

4/7
झवेरी मार्केट: मुंबईतील झवेरी मार्केट हो दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सोने, चांदी आणि विविध मौल्यवान धातूंच्या राख्या मिळतात. ज्यांना आपल्या भावासाठी दीर्घकाळ टिकाणारी मौल्यवान राखी घेण्याची इच्छा आहे, अशांसाठी हे मार्केट अतिशय चांगला पर्याय ठरू शकतं.

5/7
कोलाबा मार्केट: या मार्केटमध्ये तरुणाईची विशेष गर्दी असते. रक्षाबंधननिमित्त कोलाबा मार्केटमध्ये ट्रेंडी आणि फॅशनेबल राख्यांनी दुकाने सजली आहेत. याठिकाणी तुम्ही डिझायनर राख्या आणि स्टाइलिश गिफ्ट्स खरेदी करू शकता.

6/7
क्रॉफर्ड मार्केट: विविध गोष्टींसाठीचं 'वन स्टॉप डेस्टिनेशन' अशी ओळख असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या राख्यांची विस्तृत रेंज उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही विविध रंगाच्या आणि आकर्षक डिझाइन असलेल्या राख्यांची खरेदी करू शकता. याशिवाय आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स आणि मिठाई देखील या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

7/7
भुलेश्वर मार्केट: या ठिकाणी पारंपारिक आणि आधुनिक राख्यांचा मोठा संग्रह असतो. जर जास्त प्रमाणात राखी खरेदी करायची असेल तर या मार्केटमध्ये होलसेल दरामध्ये राख्या उपलब्ध आहेत. या मार्केटमध्ये हाताने बनवलेल्या आणि रॉयल डिझाइन्स असलेल्या राख्या ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement