मायग्रेनची समस्या सुरू झाल्यावर काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
मायग्रेनला चालना देणारे पदार्थ खाऊ नयेत. जुनं झालेलं चीज, अल्कोहोल, प्रक्रिया केलेले मांस, चॉकलेट किंवा कृत्रिम गोड पदार्थ मायग्रेनला ट्रिगर करू शकतात. असे पदार्थ टाळले पाहिजेत.
advertisement
1) काही लोकांना मायग्रेन सुरू होण्यापूर्वी सिग्नल मिळू लागतात, त्यांना 'प्रोड्रोम' म्हणतात. मायग्रेन सुरू होण्याच्या काही तास किंवा दोन दिवस आधी हे सिग्नल दिसू शकतात. मायग्रेनने ग्रस्त असलेल्या 60 टक्के लोकांना प्रोड्रोमची जाणीव होते. या लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता किंवा अतिसार, मनःस्थिती बदलणं, मान आखडणं आणि काही खाद्यपदार्थ किंवा पेयांच्या सेवनाची इच्छा होणं, यांचा त्यात समावेश असू शकतो.
advertisement
2) मायग्रेन झटका येण्याआधी किंवा दरम्यान काही लोकांना ऑराचा सामना देखील करावा लागू शकतो. मायग्रेन असणाऱ्या सुमारे 20 टक्के लोकांना ऑरा अनुभव येतो. ऑराच्या लक्षणांमध्ये दृष्टी नाहीशी होणं, चमकणारा प्रकाश किंवा स्पॉट्स दिसणं, आवाज किंवा संगीत ऐकू येणं, हात किंवा पायांमध्ये सुया टोचल्यासारखं वाटणं, यांचा समावेश होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement