Onion Benefits For Health : घरचाच कांदा पोटाची चरबी कमी करण्यासाठी रामबाण, 'असा' खा वजन झटक्यात होईल कमी!
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
पावसाळ्याच्या दिवसांत कांदा वातुळ समजला जातो. मात्र एरव्ही कांदा जवळपास दररोज स्वयंपाकात वापरला जातो. मर्यादित प्रमाणात व योग्य प्रकारे कांद्याचं सेवन केल्यास कांद्याचे आरोग्यावर काही चांगले परिणाम दिसून येतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे, विशेषतः पोटावरची चरबी कमी करायची आहे, त्यांच्यासाठी कांदा रामबाण उपाय ठरू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आहारात कोणकोणत्या प्रकारे कांद्याचा समावेश करता येतो : कांद्याचे अनेक उपयुक्त गुणधर्म पाहता, रोजच्या आहारात कांद्याचा समावेश केलाच पाहिजे. कांदा ही अशी भाजी आहे, की जी अनेक प्रकारे आहारात समाविष्ट करता येऊ शकते. सॅलडमध्ये कांद्यामुळे कुरकुरीतपणा व चवही येते. सूपमध्येही सामान्यपणे कांदा वापरला जातो. कांद्याच्या गोडसर चवीमुळे पदार्थाला स्वाद मिळतो. परतलेल्या भाज्यांमध्ये कांदा छान लागतो. साइड डिश म्हणून किंवा ग्रील्ड चिकनसोबत कॅरेमलाइज्ड कांदा खाल्ला जातो. उकळत्या पाण्यात कांद्याचे काप घालून त्याचा चहासुद्धा पिता येतो. हा एक हेल्दी पर्याय असू शकतो. कांद्याचे आणखीही काही फायदे आहेत. केसांसाठीही कांदा उपयोगी असतो. त्यामुळे कांद्याचा आहारात समावेश करायला हरकत नाही.