Protein for Vegan: शाकाहारी आहात काळजी नको, ‘या’ पदार्थांतून मिळवा प्रोटिन्स आणि राहा तंदुरूस्त

Last Updated:
Protein for Vegan: प्रथिनं किंवा प्रोटिन्स आपल्या निरोगी शरीरासाठी एक महत्त्वाचं पोषक तत्व. जंकफूड किंवा बदलत्या आहारशैलीमुळे अन्नातून मिळणाऱ्या प्रोटिन्स प्रमाण कमी झालं असून आता कार्बोहायड्रेटस आणि कॅलरीयुक्त अन्नाचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे वजनवाढीची समस्या सर्वसामान्य झालीये. मासांहारी व्यक्तींना मांस, मच्छीतून प्रोटिन्स मिळू शकतात, मात्र शाकाहारी व्यक्तीचं काय? जाणून घेऊयात शाकाहारी व्यक्तींना कोणकोणत्या पदार्थातून प्रोटिन्स मिळू शकतं.
1/7
आपल्या शरीरासाठी प्रथिनं किंवा प्रोटिन्स खूप महत्त्वाचे असतात. शरीराला उर्जा देण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत, शरीर आणि हाडांच्या वाढीपासून ते विविध हार्मोन्स शरीरात योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात सोडण्यात प्रोटिन्स महत्त्वाची भूमिका बजवतात.

advertisement
2/7
चण्यात भरपूर प्रोटिन्स आणि फायबर असतात. चणे खाल्ल्याने शरीराला त्वरीत उर्जा मिळून दीर्घकाळापर्यंत पोट भरल्यासारखं राहतं, त्यामुळे भूकही नियंत्रणात राहते.

3/7
चण्याप्रमाणेच शेंगदाणे हे सुद्धा प्रोटीनचा खजिना आहेत. शेंगदाण्यामध्ये प्रोटिन्स व्यतिरिक्त मॅग्नेशियम, फॉस्फरस, विविध जीवनसत्त्वे आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात.

4/7
वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी ओट्स चांगला आहार आहे. ओट्समध्ये प्रोटिन्ससह जवळपास सर्वच प्रकारची पोषक तत्वे आढळून येतात. त्यामुळे ओट्स खाल्ल्याने शरीराला कमी वेळात जास्त ऊर्जा मिळते.

5/7
दुधात भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतात.त्यामुळे लहान मुलांसह सर्वच वयोगटातल्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ दुधाचं सेवन करणं त्यांच्या फायद्याचं असतं. दूध प्यायल्याने लहान मुलांच्या सर्वागिण विकासाला मदत तर होते. याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही दूध फायद्याचं ठरतं.

6/7
दुधानंतर कडधान्य हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला गेलाय. मूग, मटकी,हरभरे यापैकी तुम्हाला जे कडधान्य आवडतं ते कडधान्य रात्री भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी खाल्लं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. रोज सकाळी न्याहरीच्या ऐवजी एक वाटी भिजलेली कडधान्ये खाणं तुमच्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल.

7/7
ब्रोकोली ही कोणत्या औषधापेक्षा कमी नाहीये. ब्रोकोलीत प्रोटिन्ससह विविध अँटिऑक्सिडंट्स असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement