Chocolate Brownie Recipe : उन्हाळ्यात सर्वच खातील आवडीने, घरीच बनवा चॉकलेट आईस्क्रीम ब्राऊनी, रेसिपी एकदम सोपी

Last Updated:
चॉकलेट आईस्क्रीम ब्राऊनी हा देखील झटपट असा तयार होणारा पदार्थ आहे. उन्हाळ्यासाठी अत्यंत छान हा पदार्थ आहे.
1/7
चॉकलेटचे पदार्थ खायला लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडत असतात. चॉकलेट पासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात. चॉकलेट आईस्क्रीम ब्राऊनी हा देखील झटपट असा तयार होणारा पदार्थ आहे. उन्हाळ्यासाठी अत्यंत छान हा पदार्थ आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. याची सोपी रेसिपी आपल्याला डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी सांगितलेली आहे.

advertisement
2/7
चॉकलेट ब्राऊनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी कोको पावडर, एक वाटी पिठीसाखर, एक वाटी दही, तीन ते चार चमचे बटर, व्हॅनिला इसेन्स, गरजेनुसार दूध, चिमूटभर सोडा, अक्रोड, आणि चोको चिप्स हे साहित्य लागेल.

3/7
चॉकलेट ब्राऊनी बनवण्यासाठी कृती : सर्वप्रथम एका चाळणीमध्ये गव्हाचे पीठ, कोको पावडर आणि पिठीसाखर हे सर्व एकत्रितरित्या करून चाळून घ्यायचे आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये बटर टाकायचं. ते बटर चांगल्या पद्धतीने फेटून घ्यायचं. फेटून झाल्यानंतर त्यामध्ये दही टाकायचं आणि ते दही सुद्धा फेटून घ्यायचं.

4/7
या फेटून घेतलेल्या मिक्सरमध्ये जे आपण चाळून घेतलेलं पावडर आहे ते पावडर टाकायचं. त्यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा. व्हॅनिला इसेन्स टाकायचा आणि गरजेनुसार दूध टाकून ते सर्व एकत्र करून घ्यायचं.

5/7
 हे मिश्रण जास्त पातळी नाही करायचा आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं. त्यानंतर एका भांड्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचं. त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण टाकायचं. त्याच्यामध्ये अक्रोडाचे बारीक तुकडे करून टाकायचे आणि वरतून भरपूर असे चोको चिप्स टाकायचे.

6/7
हे मिश्रण तुम्ही अव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे यापैकी काही नसेल तर तुम्ही आपल्या प्रेशर कुकरमध्ये खाली मीठ टाकायचं. हे मिश्रण त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. एक अर्धा तास ठेवायचं आणि त्यानंतर चॉकलेट ब्राउनी म्हणून ही तयार होतात.

7/7
ही चॉकलेट ब्राऊनी सर्व्ह करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक चॉकलेट ब्राऊनीचा तुकडा घ्यायचा. त्यावरती चॉकलेट सॉस टाकायचा आणि तुम्हाला आवडते त्या फ्लेवरची आईस्क्रीम टाकायची किंवा तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम देखील यावरती टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही चॉकलेट ब्राऊनी सर्व्ह करू शकता. घरी एकदा ही सोप्या पद्धतीची चॉकलेट ब्राऊनी नक्की करून बघा.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement