Summer Recipe: घरगुती साहित्यात बनवा खुसखुशीत गुळपापडी, खायला लागेल टेस्टी, रेसिपी पाहा

Last Updated:
उन्हाळ्यात गुळ आणि आंबा वापरून एक खास रेसिपी बनवू शकता. एकदा बनवली की गुळपापडीची रेसिपी 15 दिवस टिकते.
1/7
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना दिवसभर काही न काही खाण्यासाठी पाहिजे असतं. बाहेरील अन्न पदार्थ जर जास्त खाण्यात आलेत तर आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

advertisement
2/7
त्यामुळे तुम्ही घरच्या घरी काही अन्न पदार्थ बनवू शकता. त्यातीलच एक म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार होणारी गुळपापडी. ही गुळपापडी अगदी घरगुती साहित्यापासून तयार होणारी आहे. त्याची रेसिपी अमरावतीच्या मंदा बहुरूपी यांनी सांगितली आहे.

3/7
गुळ पापडी बनवण्यासाठी साहित्य : गव्हाचे पीठ, गुळ, आंब्याचा गर, तूप, मीठ, वेलची पावडर हे साहित्य लागेल.

4/7
गुळ पापडी बनवण्याची कृती :- सर्वात आधी गॅसवरील भांड्यात 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात आंब्याचा गर टाकून घ्यायचा. ते मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर लागत असल्यास त्यात तुम्ही थोड पाणी टाकून घेऊ शकता.

5/7
त्यानंतर गुळ त्यात विरघळून घ्यायचा आहे. गुळ विरघळला की ते मिश्रण चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर ते मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवून द्या.

6/7
आता गव्हाचे पीठ तयार करून घ्यायचे. त्यासाठी सर्वात आधी तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की ते गव्हाच्या पिठात टाकून घ्या. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यात वेलची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तोपर्यंत गुळाच मिश्रण थंड झालं असेल. तेव्हा पीठ मळून घ्या. या रेसिपी मध्ये दिलेलं सर्व साहित्य हे परफेक्ट मापात आहे. या साहित्यात परफेक्ट अशी गुळपापडी तयार होते. पीठ मळून झाल्यानंतर ते 5 मिनिट बाजूला ठेवून द्या.

7/7
5 मिनिटानंतर पापडी लाटून घ्यायची आहे. छोट्या छोट्या पापडी लाटून झाल्या की त्या तळून घ्यायच्या आहेत. लालसर होईपर्यंत पापडी तळून घेतली की खायला टेस्टी लागते. सर्व पापडी तळून झाल्या की तुम्ही 15 ते 20 दिवस या गुळपापडी साठवून ठेवू शकता. घरगुती साहित्यात खुसखुशीत अशी गुळपापडी कमीत कमी वेळात तयार होते. तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करू शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement