Kairiche Lonche : एकदा केलं की 5 दिवस खायचं, पारंपरिक पद्धतीने बनवा कैरीच लोणच, संपूर्ण रेसिपी पाहा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
जेवणासोबत काही तरी चटपटीत असावं म्हणून झटपट तयार होणार कैरीच लोणच अगदी घरगुती साहित्यापासून तयार होते. चार ते पाच दिवस खाण्यासाठी तुम्ही हे लोणच बनवून ठेऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
कैरीचे लोणचे बनवण्याची कृती:- सर्वात आधी बारीक काप केलेली कैरी एका भांड्यात काढून घ्यायची आहे. त्यांनतर त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यात लाल तिखट टाकायचं आहे. तिखट हे तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे. तिखट सुद्धा कैरीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
advertisement
advertisement
त्यानंतर एका वाटीमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरे आणि मोहरी तेलात छान तळतळली की ते तेल कैरित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात साखर टाकून घ्यायची. साखर तुमच्या अंदाजानुसार टाकायची आहे. साखर सुद्धा यात मिक्स करून घ्यायची.