पालकापासून घरीच बनवा कुरकुरीत आणि चविष्ट चकली; वाचा परफेक्ट रेसिपी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
चकली हा पदार्थ अनेकांचा आवडता पदार्थ आहे. तर पालकाची चकली कशी बनवावी याची रेसिपी पाहा
पालकाचे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. पालकाच्या भाजी पासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. त्यातीलच एक म्हणजे पालक चकली. चकली हा पदार्थ अनेकांचा आवडता पदार्थ आहे. तर पालकाची चकली कशी बनवावी याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी अनुजा देशपांडे यांनी सांगितली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हा गोळा तयार झाल्यानंतर चकलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण टाकून चकल्या पाडून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर तेलात तळून घ्यायचे आहेत. चकली तळताना मोठ्या आचेवर आणि खूप जास्त गरम तेलात तळू नये मंद आचेवरच तळावेत कारण असे केल्याने चकली आतून चांगली शिजवून कुरकुरीत होऊन खाण्यासही रुचकर लागते. अशाप्रकारे पालकाची चविष्ट अशी कुरकुरीत चकली बनवून तयार आहे.
advertisement
तर अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये कुरकुरीत आणि चविष्ट अशी हेल्दी पालकाची चकली ही रेसिपी आपण जाणून घेतली आहे. धुतलेला पालक, हिरवी मिरची, कडीपत्ता, तांदळाचे पीठ बेसन पीठ, उडदाच्या डाळीचे पीठ म्हणजेच चकलीचं एकत्र केलेलं पीठ, तिखट, मीठ, हळद, धने, पूड, ओव, तीळ तसेच थोडंसं लोणी या घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून स्वादिष्ट अशी पालकाची चकली बनवता येऊ शकते. तुम्ही देखील ही टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करून बघा.