advertisement

अजितदादांच्या अपघातावरून रोहित पवारांना अनेक शंका, सुप्रिया सुळेंनी मात्र नमतं घेतलं, म्हणाल्या मुलांना वाटतं की...

Last Updated:

अजित पवार यांच्या अपघाताच्या शंकांवरून पवार कुटुंबातच दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. एकीकडे रोहित पवार शंका उपस्थित करीत असताना सुप्रिया सुळे यांनी मात्र अप्रत्यक्षपणे धीराने घेण्याचा सल्ला दिलाय.

सुप्रिया सुळे-रोहित पवार
सुप्रिया सुळे-रोहित पवार
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनावर अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. दादांचा अपघात नसून हा घातपात असल्याचा संशय येत असल्याचे सांगत युरोपियन तपास यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. त्यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी काहीशी वेगळी भूमिका व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेली चौकशी होईपर्यंत थांबले पाहिजे, असा सल्ला त्यांनी रोहित पवार यांना दिला.
राज्य सरकारने अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने तपासाची घोषणा केली आहे. मात्र पंधरा दिवस झाले तरीही काहीही केले नाही, अशी खंत व्यक्त करीत युरोपियन तपास यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांमधून केली. मात्र रोहित पवार यांच्या मागणीशी सुप्रिया सुळे यांनी काही अंशी असहमती व्यक्त केली.
advertisement

अपघातासंदर्भात रोहित पवारांना शंका, पण सुप्रिया सुळे म्हणाल्या...

रोहित पवार यांच्या मागणीवर सुप्रिया सुळे यांना विचारले असता, "त्यांची अस्वस्थता साहजिक आहे, मी समजू शकते. मुलांना असे वाटते की अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरे सापडत नाहीयेत. असा अपघात का झाला, कसा झाला? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. त्याची भावना त्याने पारदर्शकपणे मांडली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे चौकशीच्या अनुषंगाने विधान आले की पारदर्शकपणे चौकशी होईल. त्यामुळे आपण चौकशीची वाट पाहूया, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement

अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने दादांचे सहकारी बोलत का नाहीत?

अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने दादांचे सहकारी बोलत का नाहीत? असे विचारले असता, या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. आमचे कुटुंब अडचणीच्या काळातून चालले आहे. आम्ही एकमेकांना आधार देत पुढे चाललोय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विलिनीकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण येत्या आज १२ तारखेला होणार होते असे विचारले असता, आमचे कुटुंब अडचणीच्या काळातून चालले आहे. आज अजितदादा नाही त्यामुळे जुने काही काढायचे नाही, अजितदादांच्या इच्छा आणि आशीर्वादाने जे काही होईल ते पाहूया, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या अपघातावरून रोहित पवारांना अनेक शंका, सुप्रिया सुळेंनी मात्र नमतं घेतलं, म्हणाल्या मुलांना वाटतं की...
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement