advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये भल्या सकाळी झाडाचा आडोसा घेऊन सुरू होता नको तो खेळ; पोलिसांनी छापा टाकताच कांड उघड

Last Updated:

औद्योगिक पट्ट्यातील शांततेचा फायदा घेत झाडांच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्या टोळीचा महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

झाडाआ़ड जुगार (AI Image)
झाडाआ़ड जुगार (AI Image)
पिंपरी-चिंचवड: औद्योगिक पट्ट्यातील शांततेचा फायदा घेत झाडांच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्या टोळीचा महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खालुंब्रे गावच्या हद्दीत 'कोर्टयार्ड हॉटेल' जवळ सुरू असलेल्या या बेकायदा अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी (१० फेब्रुवारी) सकाळी धडक कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले असून एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना खालुंब्रे परिसरात काही लोक झाडांच्या आडोशाला बसून जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब बोरकर आणि त्यांच्या पथकाने सकाळी पावणे अकराच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी '५ स्टार' कार्डावर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले.
advertisement
दोघांना अटक, तिघे पसार
पोलिसांनी घटनास्थळावरून अजित बाकसुल्ला सुलेमानी (३०, रा. महाळुंगे, मूळ- उत्तर प्रदेश) आणि सागर बंटी मालवे (२०, रा. महाळुंगे, मूळ- मध्य प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच शिवदास रतन पवार, बाबा आणि शाहीन नावाचे तिघे संशयित पसार होण्यात यशस्वी झाले. पोलीस आता या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
advertisement
मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ३,२५० रुपये रोख, जुगाराचे साहित्य आणि इतर वस्तू असा एकूण ५,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी-चिंचवडमध्ये भल्या सकाळी झाडाचा आडोसा घेऊन सुरू होता नको तो खेळ; पोलिसांनी छापा टाकताच कांड उघड
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement