घरीच तयार करायचाय वैदर्भीय स्पेशल गोळा भात? मग ही रेसिपी पाहाच
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
'गोळा भात' हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे.
चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय. 'गोळा भात' हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे. हा गोळा भात कसा तयार होतो याची माहिती नागपूरचे दिग्गज मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
गोळा भाताची कृती : सर्वप्रथम आपण नेहमी करतो त्या प्रमाणे किंवा आवश्यकतेनुसार किती जणांना हा भात करायचा आहे तितके तांदूळ घ्यावे. मी इथं एक वाटी तांदूळ घेतले आहे. त्यानंतर शेगडीवर 2 वाटी पाणी करायला ठेवावे. हे पाणी गरम होईपर्यंत दुसऱ्या भांड्याच चण्याच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये हळद, तिखट, जीरे, चवीनुसार मीठ आणि 3-4 चमचे तेल टाकावे. विदर्भात तेलाचा वापर जास्त होतो. त्याप्रमाणे हे तेल घेतले होते. हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यात थोडं पाणी घालून गोळे करावे. गोळ्यांचा आकार मध्यम असावा.
advertisement
पाण्याला उकळी आली की त्यात 2-3 चमचे दही, हळद, चवीनुसार मीठ थोडे तेल हे थोडे उकळवून त्यात तांदूळ घालावे. त्यावर झाकण ठेवून ते शिजवून घ्यावे. सर्वसाधरणपणे तांदूळ 70% शिजला की त्यामध्ये तयार केलेले गोळे टाकून उर्वरित भात शिजू द्यावा. त्यानंतर कडीपत्ता, जिर मोहरी आणि कोथिंबीर घालून तयार केलेली फोडणी त्यावर घातली की आपला गोळा भात तयार झाला. हा भात आपण चिंचेची कडी, फोडणीची कडी अथवा नुसताच खाऊ शकतो, अशी माहिती मनोहर यांनी यावेळी दिली.