कमी साहित्यामध्ये झटपट तयार करा पाकातली दहीपुरी; घरातील सर्व आवडीने खातील

Last Updated:
पाकातली दहीपुरी हा पदार्थ अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो.
1/7
 दहीपुरी हा अनेक विदर्भवासियांचा आवडता पदार्थ. पाकातली दहीपुरी हा पदार्थ अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो. त्यामुळे वेळेची कमी असली की सण उत्सवाच्या दिवशी झटपट हा पदार्थ अनेकांच्या घरी बनवला जातो. पाकातली दहीपुरी नेमकी कशी बनवतात याचीच रेसिपी <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील गृहिणी अरुणा घोंगडे यांनी सांगितली आहे.

advertisement
2/7
दहीपुरी बनवण्यासाठी साहित्य : 1 वाटी दही, 1 वाटी रवा, 2 वाटी गव्हाचे पीठ, तळण्यासाठी तेल, वेलची पूड आणि सजावटीसाठी सुकामेवा आवश्यक आहे.

3/7
दहीपुरी बनवायची कृती : सर्वप्रथम एका भांड्यामध्ये रवा आणि गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि वेलची पूड अ‍ॅड करून त्यात दही घालायचं आहे. हे दही पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता त्यात कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे.

4/7
त्यानंतर सगळं आता चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. पाण्याच्या साह्याने घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे. या गोळ्याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. तो पर्यंत एका कढईमध्ये साखर आणि पाणी अ‍ॅड करून साखरेचा साधा पाक तयार करून घ्यायचा आहे.

5/7
आता दहा मिनिटांसाठी झाकून ठेवलेला पिठाचा भिजवलेला गोळा घेऊन मोठी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. आता एका झाकणाने आपल्याला पाहिजे त्या आकाराची पुरी काढून घ्यायची आहे. या पुऱ्या आता तेलातून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत.

6/7
आता या पुऱ्या पाकात टाकून लगेच काढून घेऊन दुसऱ्या भांड्यात ठेवायचे आहेत. काही वेळाने या पुऱ्या छान मुरलेल्या आणि मऊसूत लागतील. पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. त्यावर ड्रायफ्रूट्सने सजावट करून आपण सर्व्ह करू शकता.

7/7
दहीपुरीला लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध असतात. त्यामुळे आपण ही रेसिपी कधीही बनवू शकतो. विशेष म्हणजे घरातील सर्व मंडळी आवडीने खातील अशी ही रेसिपी बनवून तयार होते. त्यामुळे तुम्ही देखील एकदा तरी पाकातली दहीपुरी नक्की ट्राय करून बघा.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement