कैरीची आंबटगोड अन् चटपटीत रेसिपी, घरीच बनवा वर्षभर टिकणारा गुळांबा

Last Updated:
घरच्या साहित्यात अगदी 5 मिनिटांत चपटीत आणि आंबटगोड गुळांबा बनवता येतो. कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न टाकता बनवलेला गुळांबा वर्षभर टिकतो.
1/7
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गृहिणी वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून ठेवत असतात. वर्षभर टिकणारे खाद्यपदार्थ तयार करण्याकडे गृहिणींचा कल असतो. आंब्याच्या कैऱ्यांपासून देखील वर्षभर टिकणारे वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. कच्ची कैरी आणि गुळापासून तयार होणारा गुळांबा अनेकांना आवडतो. अगदी कमी साहित्यात हा गुळांबा कसा तयार करायचा? याबाबत जालना येथील गृहिणी विद्या गुजर यांनी सांगितली आहे.

advertisement
2/7
गुळांबा तयार करण्यासाठी ताज्या कच्च्या कैऱ्या, दालचिनी, लवंग आणि इलायची तसेच एक वाटी गूळ, तेल किंवा तूप आदी साहित्याची आवश्यकता आहे.

3/7
सर्वप्रथम कैऱ्यांना स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे. त्यानंतर या कैऱ्यांची साल काढून घ्यायची. कैऱ्यांना व्यवस्थित किसून बारीक तुकडे करून घ्यायचे. कैऱ्यांचा किस तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करून त्यावरती स्टीलचे पातेले किंवा कढई ठेवायची. त्यामध्ये एक-दोन चमचे तेल किंवा तूप घालू शकता.

4/7
तेल गरम झाल्यानंतर दालचिनी, लवंग आणि इलायची टाकायची आहे. थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आंब्याच्या कैऱ्यांचा किस घालायचा. या मिश्रणाला 4 ते 5 मिनिटं एकजीव करून घ्यायचं. आंब्याच्या किसला चांगल्या प्रकारे पाणी सुटायला लागल्यास त्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला एक वाटी गूळ घालायचा आहे.

5/7
एक किलो आंब्याच्या कैऱ्यांचा किस असेल तर तुम्ही 800 ग्राम बारीक केलेला गूळ घालू शकता. त्याचप्रमाणे यामध्ये केसर घातल्यानंतर आणखी चव वाढू शकते. मिश्रणामध्ये गुळ घातल्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं.

6/7
गुळ घातल्यामुळे आंब्याच्या किसला तपकिरी रंग यायला सुरुवात होते. 3 ते 4 मिनिटं परतून घेतल्यानंतर पातेल्यावरती दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून गॅसची फ्लेम बंद करायची. दोन मिनिटानंतर पातेलं खाली उतरून गुळांबा प्लेटमध्ये काढून घेऊ शकता.

7/7
अशाप्रकारे अतिशय झटपट व अत्यंत कमी साहित्यात घरच्या घरी गुळांबा तयार करता येतो. कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न टाकता तयार होणारा गुळांबा तुम्ही देखील बनवू शकता. हा गुळांबा लहान मुले अत्यंत आवडीने खातात. गुळांब्याला तुम्ही एखाद्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. वर्षभर टिकणारी गुळांबाची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. (नारायण काळे, प्रतिनिधी)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement