कच्च्या कैरीपासून झटपट बनवा आंबावडी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
- Reported by:Kale Narayan
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कुरड्या, पापड्यासोबतच उन्हाळ्यात आंब्याचेही लोणचे आणि इतर पदार्थ बनवले जातात. यातीलच एक पदार्थ म्हणजे आंबावडी होय.
सर्वसामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात गृहिणी वर्षभर पुरेल असे पदार्थ घरामध्ये करून ठेवत असतात. कुरड्या, पापड्यासोबतच उन्हाळ्यात आंब्याचेही लोणचे आणि इतर पदार्थ बनवले जातात. यातीलच एक पदार्थ म्हणजे आंबावडी होय. अपचनावर आंबावडी हा एक चांगला उपाय मानला जातो. <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> येथील विद्या उजेड यांनी कच्च्या कैरीपासून झटपट होणारी ही आंबावडीची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
advertisement
आंबेवडी रेसिपी : बाजारातून कच्ची कैरी आणल्यानंतर स्वच्छ धुऊन पुसून घ्यायची. त्यानंतर कैरीची साल काढून घ्यायची. या आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या. आंब्याचे केलेले बारीक तुकडे मिक्सरमधून काढून घेऊन त्याचा बारीक एकजीव गर तयार करायचा. मिक्सर मधून गर काढत असताना त्यामध्ये थोडासा पुदिना घालायचा. ज्यामुळे त्याला हिरवट रंग येईल.
advertisement
आंब्याचा पातळ गर एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पेस्ट घालायची. भाजलेल्या जिऱ्याची पेस्ट शरीरासाठी थंडावा देणारी असते. त्यानंतर दोन वाट्या पिठीसाखर या मिश्रणात ॲड करायची. एक वाटी गर असेल तर दोन वाट्या साखर अशा प्रकारचे प्रमाण ठेवायचे. त्यानंतर या मिश्रणात एक चमचा काळं किंवा सैंधव मीठ आणि चवीप्रमाणे आपलं रोजच्या वापरातलं मीठ टाकायचं. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं.
advertisement
advertisement











