Modak: मुंबईत 'या' 5 ठिकाणी मिळतात लोण्यासारखे रसरशीत मऊसूत मोदक, एकदा चव चाखून बघा प्रेमातच पडाल
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Popular Ukadiche Modak in Mumbai: संकष्टी चतुर्थी म्हटल्यावर अनेक गणेशभक्तांच्या घरी पदार्थ आवर्जुन बनतो तो मोदक... मोदक हा अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. उद्या संकष्टी चतुर्थी आहे, उपवास सोडताना जर तुम्हीही मोदक खायच्या विचारात असाल तर ही बातमी आवश्य वाचा. मुंबईमध्ये असे अनेक दुकानं आहेत, की ज्यांच्याकडे तुम्ही ऑर्डर देऊन मोदकची ऑर्डर देऊ शकता. मुंबईसह उपनगरांमध्ये कुठे कुठे तुम्ही ऑर्डर देऊन घरबसल्या रसरशीत आणि लोणीदार मोदक खाऊ शकता, जाणून घेऊया...
सिद्धिविनायक मंदिराबाहेर असलेल्या 'मोदकम' हे दुकान मुंबईमधील फेमस दुकानांपैकी एक आहे. या दुकानामध्ये, तुम्हाला केशर, स्पेशल खव्याचे, चॉकलेट, उकडीचे मोदक असे अनेक स्पेशल मोदक तुम्हाला खायला इथे मिळतील.कुठे- 8/1, कामना को-ऑपरेटिव्ह सोसायटी, राव बहादूर एस.के. बोले रोड, प्रभादेवी, मुंबई
advertisement
1921 पासून कार्यरत असलेले, पणशीकर हे मुंबईत त्यांच्या उकडीचे मोदकांसाठी एक प्रसिद्ध नाव आहे. परवडणारी किंमत, मोदकांची चव आणि वेगवेगळ्या फ्लेवरमुळे हे दुकान प्रसिद्ध आहे. पणशीकर पारंपारिक मोदकांसोबतच चॉकलेट, केसर आणि मावा सारख्या प्रकारामुळेही ते फेमस आहेत.कुठे- 18, गणनाथ को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सेनापती बापट रोड, दादर पश्चिम, मुंबई
advertisement
आस्वाद हे अस्सल महाराष्ट्रीयन पाककृतींसाठीचं एक आवडीचं ठिकाण आहे, त्यांचे उकडीचे मोदकही त्याला अपवाद नाहीत. इथे क्वालिटी, टेस्ट सुद्धा फार फेमस आहे. आस्वादचे मोदक ताज्या तुपासोबत दिले जातात. ज्यामुळे मोदकाला एक वेगळीच चव येते.कुठे- संस्कृती बिल्डींग, गडकरी चौक, ४, लेडी जमशेदजी रोड, शिवसेना भवनाच्या समोर, दादर पश्चिम, मुंबई
advertisement
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेसह इतरत्र शहरांमध्ये, प्रशांत कॉर्नर हे स्वीटचं दुकान फार फेमस आहे. 'प्रशांत कॉर्नर' हे स्वीट शॉप ब्रँड, टेस्ट आणि स्वच्छतेसाठी ओळखला जातो. दोन दशकांहून अधिक काळाच्या कौशल्यासह, ते संपूर्ण भारतात प्रादेशिक चवींपासून प्रेरित मिठाई आणि स्नॅक्सची विविध श्रेणी देते.कुठे- मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेसह इतरत्र शहरांमध्ये आऊटलेट्स आहेत.
advertisement
उकडीचे मोदकांमध्ये एक हटक्या ट्विस्टसाठी फेमस असलेल्या 'बॉम्बे स्वीट शॉप'ला नक्की भेट द्या. इंडियन स्वीट्समध्ये वेगवेगळ्या टेस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या चॉकलेट फज (Chocolate Fudge), पुरण पोळी आणि पिस्ता खुबानी मोदक (Pista Khubani Modaks) सारखे कधीही न ऐकलेले प्रकार तुम्हाला याठिकाणी पाहायला मिळतील.कुठे- जेएके कंपाउंड, १, केशवराव बोरकर मार्ग, ढाकू प्रभुची वाडी, भायखळा पूर्व, मुंबई