Room Heater Danger : थंडीत रूम हिटर वापरताय पण 'ही' चूक करू नका, अन्यथा तुमचं हिटरच बनेल सायलेंट किलर!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Room Heater Dangers and Carbon Monoxide Safety Tips : कडक हिवाळ्यातील थंडीपासून वाचण्यासाठी बंद खोलीत हीटर किंवा फायरप्लेस वापरणे सामान्य आहे, परंतु ते प्राणघातक ठरू शकते. रात्रभर फायरप्लेस पेटवून झोपल्यानंतर बऱ्याचदा काही अप्रिय घटना घडल्याचे आपण ऐकले असे. म्हणूनच अशा गोष्टी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.
advertisement
रूम हिटर कधीकधी सायलेंट किलरबनू शकते. कारण जेव्हा बंद खोलीत कोळसा, लाकूड किंवा गॅस जळतो, तेव्हा त्याला जाळण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. बंद खोलीतील ऑक्सिजन हळूहळू कमी होतो, ज्यामुळे कार्बन मोनोऑक्साइड (CO) तयार होतो. हा एक रंगहीन आणि गंधहीन वायू आहे, जो श्वास घेताना समजत नाही. हा वायू फुफ्फुसांमधून रक्तप्रवाहात प्रवेश करतो आणि हिमोग्लोबिनशी बांधला जातो, ज्यामुळे शरीराचा ऑक्सिजन पुरवठा रोखला जातो. व्यक्ती झोपेत बेशुद्ध होते आणि हळूहळू मरते.
advertisement
त्वचा आणि डोळ्यांचा कोरडेपणा हे हीटर वापरण्याचा आणखी एक नकारात्मक पैलू आहे. हीटर खोलीतील ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे त्वचा कोरडी होते आणि डोळ्यांना जळजळ होते. शिवाय, दमा किंवा ब्राँकायटिस असलेल्यांसाठी ही हवा अत्यंत हानिकारक आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते, ज्यामुळे जागे झाल्यावर जडपणा आणि अशक्तपणा जाणवतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









