पार्क केलेल्या गाडीत AC लावताय? थांबा! जीवघेणा ठरू शकतो हा 'कूल' उपाय!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
बऱ्याचदा लोक आपली पार्क केलेली गाडी आतून थंड ठेवण्यासाठी AC सुरू करतात. पण हे योग्य आहे का? याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया...
advertisement
गाडी थांबलेली असताना आणि इंजिन बंद असताना एसी चालू ठेवणे सामान्यतः सुरक्षित मानले जात नाही, विशेषतः जास्त वेळेसाठी. यामुळे सुरक्षिततेचा धोका निर्माण होऊ शकतो आणि गाडीच्या बॅटरीचेही नुकसान होऊ शकते. आधुनिक गाड्या थोड्या काळासाठी एसी चालवणे सहन करू शकत असल्या तरी, ते इंजिन किंवा पर्यावरणासाठी चांगले नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मग काय करावे? : जर तुम्ही पार्क केलेल्या गाडीत एसी चालवत असाल, तर खिडक्या उघड्या ठेवा. कमीतकमी एक खिडकी तरी उघडी ठेवा. यामुळे हवा खेळती राहील. जेव्हा गाडी उन्हात पार्क केलेली असते, तेव्हा तिच्या आत बेंझिन जमा होऊ शकते. खिडक्या उघडल्याने गाडीला हवा मिळते आणि या विषारी घटकांच्या संपर्कात येण्याचा धोका कमी होऊ शकतो.