भाजी स्वादिष्ट, पानं गुणकारी; रक्तदाब, मधुमेह ठेवतात नियंत्रणात

Last Updated:
आपण जगभरातले वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी वरण, भात, पोळी, भाजी हेच सत्य आहे यावर आपला विश्वास असेलच. म्हणजे काय, तर घरचं जेवण ते घरचं जेवण. ते जितकं ताजं आणि पौष्टिक असतं, तसं जेवण आपल्याला बाहेर कुठेच मिळत नाही. आपल्या भाजीतही शरिराला विविध पोषक तत्त्व पुरवण्याची ताकद असते.
1/5
कडधान्य आणि पालेभाज्या आपण आवडीने खातो. भाजीशिवाय आपलं जेवण अपूर्णच असतं. चण्याची भाजी आणि चण्याची उसळ म्हणजे तर अनेकांचा जीव की प्राण असते. परंतु चण्याच्या पानांची भाजीही स्वादिष्ट लागते हे तुम्हाला माहितीये का?

advertisement
2/5
महत्त्वाचं म्हणजे चण्याच्या पानांची भाजी शरिरासाठी गुणकारीदेखील मानली जाते. यामुळे मधुमेहासह रक्तदाब नियंत्रणात राहतं. म्हणूनच ही भाजी खाल्ल्यास आपण सुदृढ राहू शकतो.

3/5
केवळ मधुमेह आणि रक्तदाबच नाही, तर चण्याच्या पानांच्या भाजीमुळे हृदयासंबंधित आजारांवर आणि स्थूलपणावरही नियंत्रण मिळतं. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे कुपोषणावरही मात करता येते.

4/5
आपण आपली त्वचा तुकतुकीत आणि तजेलदार दिसावी यासाठी विविध घरगुती उपाय करतो. चण्याची डाळ वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावतो. या डाळीप्रमाणे चण्याची पानंदेखील त्वचेसाठी गुणकारी असतात. या पानांमुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत होते.

5/5
सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी चण्याची पानं उपयुक्त ठरतात. त्यामुळे या पानांची भाजी खाऊन आपण आपलं विविध आजारांपासून संरक्षण करू शकतो हे निश्चित.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement