Tourist Places Nashik: पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन केलाय? एका दिवसात नाशिकमधील 4 ठिकाणांना द्या भेट, भन्नाट होईल ट्रिप
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तुम्ही देखिल पावसासोबत निसर्गाचा आनंद नाशिकमध्ये घेऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत निसर्गरम्य वातावरणात फॅमिली टाईम घालू शकणार आहात.
advertisement
advertisement
advertisement
पंचवटी- या ठिकाणी पावसाळ्यात गोदावरी नदी ही खळखळत वाहत असते. अनेक वेळेस या ठिकाणी तर पूर देखिल येत असतो, जो आपण पंचवटीतील पुलावरून उभे राहून पाण्याला पाहण्याचा आनंद घेऊ शकतो. या ठिकाणीच तुम्हाला भारतातील एकमेव असे मंदिर ज्या ठिकाणी नंदी नसलेल्या महादेवाचे रूप पाहायला मिळणार. तसेच कलाराम मंदिर आणि सीता गुफा देखिल तुम्ही जाऊ शकणार आहात.
advertisement
पांडव लेणी- ही लेणी पुरातन कलेचा अद्भुत असा नमुना आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचे असे चित्रे कोरली आहेत. पाथर्डी गावच्या फाट्यापासून काहीच अंतरावर ही लेणी एका डोंगरावर कोरली आहे. साधारण 2 तासात तुम्ही या लेणीचे संपूर्ण चित्र पाहून पुढचा प्रवास करू शकणार आहात. या ठिकाणी तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅण्डवरून रिक्षाने सहज जाऊ शकणार आहात.
advertisement
चौथे ठिकाण नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर हे स्थळ देखील पावसाळ्यात सहलीसाठी खूप उत्तम असे ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असलेले निसर्गसौंदर्य पाहून प्रत्येक व्यक्ती आकर्षित होतो. या ठिकाणी असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा व त्यांना चढलेला हिरवाईचा साज पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी असलेले ब्रम्हगिरी पर्वतावर देखिल जाऊ शकणार आहात.
advertisement









