ऐतिहासिक किल्ल्यांवर द्या सरत्या वर्षाला निरोप, विदर्भातील हे किल्ले पाहाच!
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भातही अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. नव्या वर्षाची सुरुवात या किल्ल्यांच्या भेटीनं करू शकता.
जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा विचार करतात. यासाठी अनेकजण किल्ल्यांचा पर्यायही निवडतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विचार केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विचार प्रामुख्यानं येतो. विदर्भातही अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. त्याबाबत अनेकांना फारशी माहिती नाही. आज आपण विदर्भातील अशाच किल्ल्यांबाबत जाणून घेणार आहोत.
advertisement
किल्ले बाळापूर हे ठिकाण अकोल्यापासून 25 किमीवर मान व म्हैस नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. गावात शिरताच हा किल्ला लक्ष वेधून घेतो. मुघलांनी बांधलेल्या या किल्ल्याचे बांधकाम अजूनही सु स्थितीत शाबूत आहे. किल्ल्याला बाहेरच्या तटबंदीत दोन आणि आतल्या तटबंदीत एक असे एकूण चार दरवाजे आहेत. त्यावर मुघलकालीन नक्षीकाम पाहायला मिळते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement