नव्या वर्षाच्या स्वागताला बाहेर पडताय? जालन्यातील या 5 ठिकाणांना द्या भेट

Last Updated:
Jalna Tourism: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. जांबूवंत मंदिर आणि राजूर गणपतीसह जालन्यातील या 5 ठिकाणांना भेट देऊ शकता.
1/7
नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. अनेक जण नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचे स्वागत साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात. जालना जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणांना नाताळच्या सुट्ट्यांमध्ये आपण भेट देऊ शकतो. अशाच 5 ठिकाणांबाबत जाणून घेऊ.

advertisement
2/7
राजूर गणपती: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये राजूर गणपती संस्थान आहे. जालना शहरापासून अवघे 25 किमी अंतरावर असलेली राजूर येथील गणपती मंदिर मराठवाड्याबरोबरच संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. चतुर्थीला इथे गणेश भक्तांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये राजूर गणपती संस्थानाला तुम्ही आवश्यक भेट देऊ शकता व नवीन वर्षाची प्रसन्न सुरुवात करू शकता.

3/7
श्रीक्षेत्र जांब: समर्थ संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव म्हणजेच जांब समर्थ हे गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये आहे. रामदास स्वामींच्या या गावाला तुम्ही नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नाताळच्या सुट्ट्यांमध्ये आवश्यक भेट देऊ शकता. या ठिकाणी असलेले श्री राम मंदिर अतिशय पुरातन व प्राचीन असल्याचे सांगितलं जातं.

4/7
जांबुवंत गड: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील जामखेड या गावात श्रीक्षेत्र जांबुवंतगड आहे. संपूर्ण देशामध्ये जांबुवंताचे एकमेव मंदिर जालना जिल्ह्यात या ठिकाणी आहे. तसेच जामखेड आणि आसपासच्या तब्बल 13 खेडेगावांमध्ये मारुतीच्या मंदिरा ऐवजी जांबुवंताचे मंदिर आहे. तसेच या 13 गावांमध्ये हनुमाना ऐवजी जांबुवंताची पूजा व आराधना केली जाते. नयन रम्य निसर्ग सौंदर्याने नटलेला हा गड तुम्ही सुट्ट्यांमध्ये पाहू शकता. 

5/7
शंभू महादेव मंदिर परिसर: जालना जिल्ह्यातील नेरसेवली परिसरामध्ये असलेले शंभू महादेव मंदिर आणि परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्याचबरोबर जवळच असलेले श्री क्षेत्र नांगरतास देखील रमणीय तीर्थस्थळ आहे. नाताळच्या सुट्ट्या किंवा नवीन वर्षाचे स्वागत तुम्ही या ठिकाणी भेट देऊन करू शकता. 

6/7
मोतीबाग चौपाटी: जालना शहरातील मोतीबाग चौपाटीला तुम्ही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करू शकता. मोती बागेमध्ये लहान मुलांसाठी टॉय ट्रेन, रंगीत कारंजे, विविध प्रकारच्या खेळण्या आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बाजूलाच असलेल्या मोती तलाव चौपाटीवर खवय्यांसाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर असतात. ज्या ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची चव तुम्ही घेऊ शकता.

7/7
मराठवाड्यामध्ये देखील अनेक फिरण्यासारखी ठिकाणे आहेत. जिथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वर्षभर देशभरातून आणि परदेशातूनही मोठ्या संख्ये पर्यटक येत असतात. आपण देखील वर्षाअखेरच्या सुट्ट्यांत या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement