Jotiba Yatra: ज्योतिबा यात्रेसाठी कोल्हापुरात येताय? एका दिवसाच्या पर्यटनासाठी 5 बेस्ट ठिकाणं, PHOTOS
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Kolhapur Tourism: चैत्र यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर येणार असाल तर कोल्हापूरच्या पर्यटनाचाही आनंद लुटू शकता. धार्मिक, निसर्ग आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी ही ठिकाणे पाहाच.
ज्योतिबाची चैत्र-यात्रा हा कोल्हापूर आणि परिसरातील भाविकांसाठी एक मोठा उत्सव आहे. या काळात लाखो भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी डोंगरावर गर्दी करतात. चैत्र महिन्यातील ही यात्रा श्रद्धा आणि आनंदाचा संगम घेऊन येते. विशेष म्हणजे, यावर्षी यात्रेच्या काळात लहान मुलांच्या शालेय परीक्षाही संपलेल्या आहेत. त्यामुळे यात्रेसोबत कोल्हापुरातील काही ठिकाणांना भेट देऊन सुट्टीचा देखील आनंद लुटता येईल.
advertisement
ज्योतिबाच्या यात्रेनंतर कोल्हापुरात थांबून महालक्ष्मी मंदिराला भेट देणे अत्यंत योग्य ठरेल. हे मंदिर राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून, येथील स्थापत्य आणि शिल्पकला पाहण्यासारखी आहे. मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी होणारी आरती भाविकांना आध्यात्मिक शांती प्रदान करते. लहान मुलांसह कुटुंबाला येथील शांत आणि पवित्र वातावरण नक्कीच आवडेल. मंदिर परिसरात असलेली बाजारपेठही खरेदीसाठी उत्तम आहे, जिथे तुम्हाला कोल्हापुरी साड्या आणि चपलांची खरेदी करू शकता.
advertisement
दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव. चैत्रातील उन्हाळ्याच्या दिवसांत संध्याकाळी या तलावाच्या काठावर फिरणे हा एक ताजेतवाने अनुभव ठरेल. तलावाच्या पाण्यात सूर्यास्ताचे प्रतिबिंब पाहणे आणि बोटिंगचा आनंद घेणे मुलांसाठी खास आकर्षण आहे. येथील शांतता आणि हिरवळ कुटुंबासह विश्रांतीसाठी उत्तम पर्याय आहे. जवळच असलेली छोटी उद्याने आणि खाद्यपदार्थांची दुकाने येथील वेळ आणखी रमणीय बनवतात.
advertisement
इतिहास आणि साहसाची आवड असणाऱ्यांसाठी पन्हाळा किल्ला हा एक उत्तम पर्याय आहे. ज्योतिबापासून जवळच असलेला हा किल्ला कोल्हापूरच्या गतवैभवाची कहाणी सांगतो. किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाचे विलोभनीय दृश्य आणि थंड हवामान यामुळे येथे कुटुंबासह पिकनिकचा आनंद घेता येतो. किल्ल्यावरील तीन दरवाजा, धान्याचे कोठार, सज्ज कोठी ही ठिकाणे मुलांना इतिहासाची ओळख करून देतील. येथे पोहोचण्यासाठी वाहनांचा वापर करावा लागतो, त्यामुळे नियोजन महत्त्वाचे आहे.
advertisement
न्यू पॅलेस आणि भवानी मंदिर ही कोल्हापुरातील आणखी दोन ठिकाणे आहेत, जी तुमच्या सुट्टीला परिपूर्ण बनवतील. न्यू पॅलेस हे छ. शाहू महाराजांचे निवासस्थान असून, येथील संग्रहालयात दुर्मीळ वस्तू, शस्त्रास्त्रे आणि छायाचित्रे पाहायला मिळतात. मुलांना येथील वाघाच्या कातडीपासून बनवलेली शिकारीची चित्रे आणि राजेशाही वस्तू पाहून आश्चर्य वाटेल. भवानी मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी जोडलेले असून, येथील शांत वातावरण आणि सुंदर मूर्ती पाहण्यासारखी आहे.
advertisement
advertisement









