Monsoon Tourism: पावसाळ्यात अनुभवा स्वर्गाचं सुख, नाशिकमधील ही 5 पर्यटनस्थळे पाहिली का?

Last Updated:
Monsoon Tourism: पावसाळी पर्यटनासाठी बाहेर जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. यंदा तुम्हीही असाच प्लॅन करायच्या विचारात असाल तर नाशिकमधील ही 5 ठिकाणे पाहिलीच पाहिजेत.
1/7
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा हा निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाशिक सारख्या जिल्ह्यात तर निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की आपसुकच नाशिकमधील या ठिकाणांकडे पर्यटकांचा ओढा वाढतो. अशाच 5 ठिकाणांबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

advertisement
2/7
दूधसागर धबधबा– हा धबधबा नाशिक शहराच्या जवळ असून पावसाळ्यात गोदावरी नदी खळाळून व्हायला लागली की गंगापूर गावाजवळ सोमेश्वर मंदिरापासून काही अंतरावर हा धबधबा वाहण्यास सुरुवात होते. हा धबधबा दगडी कातळावरून नदीपात्रामध्ये कोसळतो. त्या वेळी हे दृश नयन रम्य असे असते.

3/7
वणीचा सप्तशृंगी गड–सह्याद्री डोंगररांगांच्या पूर्व पश्चिम पर्वत रांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे 4569 फुट उंचीवर सप्तशृंगी गड हे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येतेच परंतु त्यासोबत तिथे भक्तीने ओथंबून वाहणारे वातावरण देखील अनुभवता येते. नाशिक शहराच्या उत्तरेस 65 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी डोंगर रांगांवर आलेले ढग पर्यटकांना आकर्षित करतात.

4/7
त्र्यंबकेश्वर– नाशिक पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर हे स्थळ देखील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. इथं असणाऱ्या सह्याद्री डोंगररांगा व त्यांना चढलेला हिरवाईचा साज पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्यातच पावसात ब्रम्हगिरी चढणे म्हणजे स्वर्गात फिरायला जाणे मानले जाते. त्र्यंबकेश्वरला जात असताना अंजनेरी या गावाचा फेरफटका देखील मारावा. या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याचे सांगितले जाते.

5/7
हरिहर किल्ला- हरिहर किल्ला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत आहे. नाशिक पासून अवघ्या 53 किलोमीटर वर हा किल्ला आहे. तसेच समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची 1120 मीटर आहे. पायथ्यापासूनच हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. या गडावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. हा किल्ला ट्रेकिंगसाठी थोडा अवघड आहे. या किल्ल्यावरून अजणेरी किल्ला, भास्करगड, उटवड किल्ला ही शिखरे पाहता येतात.

6/7
इगतपुरी: इंद्रपुरी जिला इगतपुरी म्हणून ओळखल जाते. पावसाळ्यातील भटकंतीमध्ये इगतपुरी तालुक्याला भेट देणे म्हणजे एक प्रकारे स्वर्गाला भेट देण्यासारखेच आहे. या ठिकाणी मनसोक्त बरसणाऱ्या पावसाच्या धारा या जलधारांमध्ये चिंब भिजलेली इगतपुरी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. तसेच इगतुपरीच्या जवळच भआवली धरण असून तेही पाहता येते.

7/7
दरम्यान, नाशिक जिल्हा हा धार्मिक, निसर्ग आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर प्रमाणेच पंचवटी, दिंडोरी, कपालेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच पांडवण लेणी, मांगी तुंगी, रामशेज किल्ला, गंगापूर धरण, तपोवन आदी पर्यटनस्थळे देखील पाहण्यासारखी आहेत.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement