छत्रपती शिवरायांनी या किल्ल्यावर ठेवले कैदी, आता महाराष्ट्रातील सर्वात अवघड ट्रेक, PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
जावळीच्या घनदाट जंगलात ट्रेकर्सला खुणावणारा वासोटा किल्ला एक महत्त्वाचं पर्यटन केंद्र आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला समृद्ध निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांना भुरळ घालत असतात. पण साहसी ट्रेक म्हटलं की सर्वांना वासोटा किल्ल्याची आठवण होते. जावळीचं घनदाट जंगल आणि झाडा-झुडपातून, पाण्यातून जाणाऱ्या मार्गामुळे हा ट्रेक संस्मरणीय असाच होतो.
advertisement
वासोटा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून पर्यटक येत असतात. या किल्ल्याच्या इतिहासातही महत्त्वाच्या नोंदी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव व्याघ्रगड असं ठेवलं होतं. शिवकाळात या गडाचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला जात असे. कालांतराने याचं नाव वासोटा पडलं असावं असं सांगितलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
किल्ल्यावर पोचताच समोर मारुतीरायाचे दर्शन होते. किल्ला आणि त्यावरून कोयना आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या विलोभनीय दृश्याने दोन-अडीच तास केलेल्या पायपिटीचा थकवा संपूर्ण निघून जातो. वासोटा किल्ल्याच्या जवळ नागेश्वर नावाचे गुहेतले शिवमंदिर आहे. ते बघून एका दिवसात पुन्हा वासोटा गडावर परतावे लागते किंवा तिथून खाली कोकणात उतरता येते.
advertisement
advertisement
advertisement