advertisement

KDMC Mayor Election: कल्याण-डोंबिवली महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट, ठाकरे गटाच्या भूमिकेने चर्चांना उधाण, नेमकं झालं तरी काय?

Last Updated:

KDMC Mayor Election: या निवडीपेक्षा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी दिलेल्या 'धक्क्या'चीच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

कल्याण-डोंबिवली महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट, ठाकरे गटाच्या भूमिकेने चर्चांना उधाण, नेमकं झालं तरी काय?
कल्याण-डोंबिवली महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट, ठाकरे गटाच्या भूमिकेने चर्चांना उधाण, नेमकं झालं तरी काय?
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेना-भाजप महायुतीने बाजी मारली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली विजय चौधरी यांची महापौर पदी, तर भाजपचे राहुल दामले यांची उपमहापौर पदी निवड झाली आहे. मात्र, या निवडीपेक्षा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी दिलेल्या 'धक्क्या'चीच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

ठाकरे गटाचे सर्व ११ नगरसेवक गैरहजर

या निवडणुकीत सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व ११ नगरसेवक मतदानासाठी गैरहजर राहिले. यामध्ये ७ मूळ ठाकरे गटाचे, २ शिंदे गटाला पाठिंबा देणारे आणि २ मनसेचे असूनही ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक होते. गेल्या काही दिवसांपासून 'बेपत्ता' असल्याचे सांगण्यात येणारे नगरसेवक मधुर म्हात्रे, किर्ती ढोणे, राहुल कोट, स्वप्नाली केले हे देखील मतदानासाठी फिरकले नाहीत.
advertisement

महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्याने महायुतीकडे आधीच मोठे संख्याबळ होते. त्यातच विरोधी बाकांवरील ठाकरे गटाचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने महायुतीचा विजय अधिकच सुकर झाला. हर्षाली चौधरी आणि राहुल दामले यांच्या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राजकीय गणिते आणि तर्क-वितर्क

उबाठा गटाचे नगरसेवक ऐन निवडणुकीच्या वेळी गैरहजर का राहिले? याबाबत आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मधुर म्हात्रे आणि किती ढोणे यांच्या बेपत्ता असण्यामागे आणि आजच्या गैरहजेरीमागे काही मोठी राजकीय खेळी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधकांनी सभात्याग केला की ही एक रणनीती होती, यावर आता कल्याण-डोंबिवलीत चर्चांना उधाण आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC Mayor Election: कल्याण-डोंबिवली महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट, ठाकरे गटाच्या भूमिकेने चर्चांना उधाण, नेमकं झालं तरी काय?
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement