उन्हाळी सुट्टीत फिरायला जायचंय? पुण्यातील ही 5 ठिकाणं आहेत बेस्ट पर्याय
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर पुण्यातील 5 ठिकाणं उत्तम पर्याय आहेत.
उन्हाळा आला की अनेकजण उन्हाच्या झळांपासून थोडा काळ सुटका मिळवण्यासाठी कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मे महिन्यात तर सूर्य अक्षरश: आग ओकतो. त्यामुळे या महिन्यात फिरायला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. पण अनेकांना नेहमीच्या ठिकाणांवर जाऊन कंटाळा आलेला असतो. अशात नेहमीच्या ठिकाणांना न जाता तुम्हाला मे महिन्यातील उन्हाच्या झळांपासून दूर जायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांचे पर्याय घेऊन आलो आहोत.
advertisement
शिवनेरी किल्ला - पुणे शहरापासून 97 किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान होते. किल्ला 300 मीटर उंच डोंगरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सात दरवाजे ओलांडावे लागतात. यावरून किल्ला किती संरक्षित झाला असावा हे लक्षात येते. किल्ल्याच्या आत तुम्हाला बदामी तलाव नावाचा एक मोठा तलाव दिसेल. त्याशिवाय शिवाजी आणि त्यांची आई जिजाबाई यांचा पुतळा देखील आहे. येथे एकदा तुम्ही भैरवगड, चावंड जीवनधन आणि जुमनारसह शिवनेरी टेकडीजवळील इतर किल्ल्यांना भेट देऊ शकता.
advertisement
advertisement
लाल महाल - पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महाल पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. लाल विटांची रचना पाहताक्षणी भुरळ पाडते. शिवाजी महाराजांनी शाईस्ताखानची बोटे छाटली त्या घटनेचे हे ठिकाण साक्षीदार आहे. राजवाड्याच्या भिंती शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करणाऱ्या चित्रांनी सजलेल्या आहेत.
advertisement
लेण्याद्री - पुणे जिल्ह्यात अष्टविनायकांपैकी एक सहावा गणपती लेण्याद्री येथे आहे. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. याठिकाणी दर्शनासाठी तुम्हाला उंच डोंगरवर चढावं लागेल. सभामंडपाच्या तिन्ही बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत. यातील उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मजाची मूर्ती कोरलेली आहे. गणेश लेणी समूहात 2 चैत्यगृहे, 28 विहार, पाण्याची 15 कुंडे आणि 6 शिलालेख आहेत.
advertisement
रामदरा मंदिर - पुणे शहरातील लोणी काळभोर येथे निसर्गरम्य परिसरात रामाचे मंदिर आहे. मंदिरात भगवान श्रीराम, सीता माता आणि श्री लक्ष्मण तसेच श्री दत्तात्रेय या देवतांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिरातील शिवलिंग धुंडीबाबांनी स्वतः कोरलेले आहे. मंदिरात पवित्र स्मृतिचिन्हेही आहेत. तिबेटमधील 12 ज्योतिर्लिंगही येथे आहेत.
advertisement