PHOTOS : याठिकाणी या आणि बर्फाच्या तलावावर करा स्केटिंग, नेमका काय आहे हा प्रकार?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हिमाचल प्रदेश हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन राज्य आहे. उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये याठिकाणी लाखो पर्यटक येथे येतात. तसेच विविध साहसी खेळांचा आनंद घेतात. आता पर्यटकांसाठी येथे आइस स्केटिंगही होत आहे. विशेष म्हणजे हे स्केटिंग गोठलेल्या बर्फावर होत आहे. (कपिल, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
लाहौल स्पिती या आदिवासी जिल्ह्याच्या सिस्सू तलावात आईस स्केटिंग सुरू करण्यात आले आहे. येथे प्रथमच प्रशिक्षण शिबिर आयोजित करून स्केटिंग शिकविण्यात आले. हे शिबिर तीन दिवस चालले. हिमाचल प्रदेश आइस स्केटिंग असोसिएशन आणि जिल्हा प्रशासनाने पर्यटनाला चालना देण्यासाठी स्केटिंग सुरू केले आहे. जास्त बर्फवृष्टीमुळे याठिकाणी जाणे धोक्याचे असते.
advertisement
advertisement