खंडाळा सोडा, आता कोल्हापूरपासून जवळ घ्या फिरण्याचा आनंद, थंडगार हवा आणि वीकेण्डची मज्जा

Last Updated:
Kolhapur Tourism: उन्हाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा विचार करत असाल तर कोल्हापूरजवळ बेस्ट पर्याय आहे. रत्नागिरी महामार्गावर अंबा घाटाला पर्यटकांची पसंती मिळतेय.
1/7
उन्ह चांगलंच तापलं असून सुट्ट्या मिळाल्या की पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाणी बाहेर जाण्याचा विचार अनेकजण करतात. थंड आणि आल्हाददायक वातावरण असणाऱ्या ठिकाणांनाच या काळात सर्वांची पसंती असते. उन्हाळी पर्यटनाचा विचार करत असाल तर आपल्यासाठी कोल्हापूरपासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर एक बेस्ट पर्याय आहे.

advertisement
2/7
घनदाट जंगल, हिरवीगार वनराई आणि त्यासोबतच पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपणारे हे प्रसिद्ध ठिकाण आहे. विशेष म्हणजे इथं तिन्ही ऋतुत पर्यटन करण्यासाठी अनुकुल वातावरण असतं. अगदी कडक उन्ह्यातसुध्दा तुम्हाला पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो.

3/7
शाहूवाडी तालुक्यातील अंबा हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3400 फूट उंचीवर हे ऐतिसाहिक वारसा जपणारं ठिकाण आहे. निसर्ग संपन्न आणि थंड हवेच ठिकाण म्हणून देखील हे ठिकाण ओळखलं जातंय. इथं उन्हाळ्यात (एप्रिल - मे) दिवसाचे तापमान 24 ते 28 अंश सेल्सिअस असते, तर रात्री ते 16 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येतं.

4/7
जंगलात ट्रेक आणि फेरफटका, पक्षी निरीक्षण, दिवस आणि रात्री जंगल सफारी, घोडेस्वारी, वन्यजीव छायाचित्रण, पॅराग्लायडिंग अशा सुविधा इथं उपलब्ध आहेत. तसेच इथे तुम्हाला करवंदे, जांभूळ, नेर्ली, फणस, आंबा अशी एक ना अनेक रानमेवा, रानभाज्या मनसोक्त खाण्याचा आनंद लुटता येईल.

5/7
वन्य जिवांमध्ये सर्वात छोटे हरीण म्हणजेच गेळा (माउस डीअर असणारे), जगातील सर्वात मोठे फुलपाखरू आशिया पतंग (अटलास मॉथ), मलबारी पिटवायपर (चापडा), देशातील सर्वात मोठे फुलपाखरू सदर्न बर्डविंग व मोठे हरीण म्हणजे सांबर घनदाट जंगलात आढळतात. राज्याचे मानचिन्ह शेखरू हे देखील इथं पाहता येईल.  

6/7
अंबा गावात किंवा शाहूवाडीत काही आरामदायी रिसॉर्ट्स आणि होम स्टे उपलब्ध आहेत. यामध्ये जंगल रिसॉर्ट, अंबा रिसॉर्ट, वनश्री हॉलिडे रिसॉर्ट, वनविसावा रिसॉर्ट, मनाली रिसॉर्ट, हॉर्नबिल डिलक्स हिल रिसॉर्ट, सवाई मानसिंग रिसॉर्ट, पावनखिंड रिसॉर्ट हे काही पर्याय आहेत.

7/7
अंबा घाट हे नव्याने विकसित होणाऱ्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. इथं अजून पर्यटकांची वर्दळ कमीच दिसते. त्यामुळे तुम्हाला इथं फारसे रेस्टॉरंट सापडणार नाहीत. परंतु, अंबा घाटातील रिसॉर्टमध्ये तुम्हाला उत्कृष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळेल. अस्सल कोल्हापुरी पद्धतीच्या जेवणावर देखील इथं ताव मारता येतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement