नवरा-बायकोची कमाल, कारला बनवलं अगदी घरासारखं, किचन अन् बेडही त्यातच, होतोय हा मोठा फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रत्येका दाम्पत्याच्या यशाचं रहस्य त्यांची एकता असते. आज अशाच एका दाम्पत्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. गुजरातच्या राजकोट येथील हे दाम्पत्य आहे. हे दाम्पत्य संपूर्ण सौराष्ट्रमध्ये ओळखले जाते. या दाम्पत्याने आपल्या कारलाच आपले घर बनवले आहे. या कारच्या माध्यमातून त्यांनी 8 राज्यांची यात्राही केली आहे. पण या कारची कहाणी काय आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत. (मुस्तुफा लाकडावाला/राजकोट, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नवीनभाई यांच्या पत्नी काजलबेन यांनी सांगितले की, जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो, तेव्हा एका खोलीचे भाडे 15 हजार रुपये द्यावे लागते. हे एका सामान्य माणसासाठी शक्य नसते. त्यामुळे आपल्या कारलाच आपले घरा बनवावे, असा विचार आमच्या मनात आला. हे कठीण होते. यासाठी इंटरनेटवर माहिती शोधली. शेवटी एक सेटअप मिळाला. यामध्ये वॉशरूम, किचन, गॅस-शेगडी, बेड, अंघोळीचा सर्व सामान येतो. या सर्व वस्तूंना कारमध्ये चांगल्या पद्धतीने ठेवता येते.
advertisement
कार तयार केल्यानंतर पंड्या दाम्पत्याने 2023 मध्ये आपला पहिला प्रवास केला. इतकेच नव्हे तर त्यांनी गुज्जू कपल ट्रॅव्हलर नावाने एक चॅनेलही सुरू केले. आतापर्यंत या जोडप्याने आपल्या या घरासारख्या कारच्या माध्यमातून उत्तराखंड, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, काश्मिरसह 8 राज्यांची यात्रा केली आहे. नवीनभाई आणि काजल यांना आता संपूर्ण सौराष्ट्र ओळखायला लागले आहे.