पर्यटनाच्या राजधानीत करा ख्रिसमस सुट्टी एंजॉय, ही 5 ठिकाणे नक्की पाहा
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
ख्रिसमसच्या सुट्टीत एंजॉय करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील या 5 ठिकाणांना भेट देऊ शकता.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख आहे. जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वारसा असलेले पर्यटन स्थळे आहेत. आता ख्रिसमस जवळ आला आहे. या सुट्टीत एंजॉय करण्यासाठी पर्यटन स्थळांच्या शोधात असाल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी काही अंतरावर असलेल्या या 5 ठिकाणांना भेट देऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
बीबी का मकरबा या वास्तूला बांधण्यास सतराव्या शतकात सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे. 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम हिचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. तिला जिथं दफन करण्यात आलं. तिथेच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला. शहरापासून 3 किमी अंतरावर हा मकबरा आहे.
advertisement
वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजी नगर शहरापासून 30 कि.मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे.
advertisement