होय, इथेच आहे स्वर्गाचा दरवाजा! ब्रह्मा-विष्णू-महेश 'या' सरोवर करतात अंघोळ; हे अद्भूत ठिकाण आहे तरी कुठे?
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील सातोपंथ सरोवर हे बद्रीनाथ मंदिरापासून 19 किमी अंतरावर वसले आहे. हे सरोवर 4600० मीटर उंचीवर असून त्याची रचना त्रिकोणी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार...
advertisement
बद्रीनाथ धामला भेट देणारे भक्त आणि ट्रेकर्स आता बद्री विशालच्या दर्शनानंतर सतोपंथकडे वळत आहेत. माणा गावाला भारताचे शेवटचे गाव म्हणतात. येथून 19 किलोमीटरच्या ट्रेकनंतर सतोपंथ सरोवरावर पोहोचता येते. ४4600 मीटर उंचीवर असलेले हे सरोवर त्याच्या त्रिकोणी आकारामुळे, रहस्यमय इतिहासामुळे आणि विहंगम दृश्यामुळे ओळखले जाते. मात्र, हा ट्रेक खूप कठीण आहे.
advertisement
सतोपंथ हे केवळ एक ट्रेकिंग स्पॉट नाही; ते एक पौराणिक ठिकाण देखील आहे. गीताराम भट्ट सांगतात की, पौराणिक मान्यतेनुसार, पांडवांनी याच ठिकाणाहून स्वर्गासाठी प्रस्थान केले होते. याच मार्गावर भीमाचा मृत्यू झाला आणि युधिष्ठिराला स्वर्गात नेण्यासाठी येथे एक दिव्य रथ आला होता. सरोवराच्या पुढे स्वर्गारोहिणी ग्लेशियर आहे, जो 'स्वर्गाकडे जाणाऱ्या पायऱ्या' या श्रद्धेशी जोडलेला आहे.
advertisement
advertisement
advertisement