Tourist Place in jalna: निसर्गरम्य वातावरण अन् धबधबे, पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी जालन्यातील 5 पर्यटन स्थळांना द्या आवश्यक भेट

Last Updated:
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात फिरायला जाण्याची इच्छा होत असते. जर तुम्ही मराठवाड्यातील जालना शहरात असाल तर जालन्यातील या पाच ठिकाणांना आवश्यक भेट देऊ शकता.
1/5
 जालना शहरापासून तीन ते चार किमी अंतरावर असलेल्या समृद्धी महामार्गाच्या बाजूला पारसी टेकडी आहे. या ठिकाणाहून समृद्धी महामार्गाचा अत्यंत सुंदर नजारा पाहायला मिळतो. टेकडीवर विविध प्रकारची झाडे आणि निसर्गरम्य वातावरण आहे.

advertisement
2/5
जर तुम्ही फॅमिलीसह फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर जालना शहरांमध्ये जुना जालना भागात असलेलं मोतीबाग तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. इथे लहान मुलांसाठी टॉय ट्रेन रंगीत कारंजे यासारखी मनोरंजनाची साधने देखील उपलब्ध आहेत.

3/5
जालना शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या वन विभागाच्या राखीव क्षेत्रामध्ये कणकणेश्वर महादेव मंदिर आहे. या ठिकाणी अत्यंत निसर्गरम्य असा परिसर असून एकांत पाहायला मिळतो. त्याचबरोबर मोर, हरीण, नीलगाय असे प्राणी आणि विविध नाविन्यपूर्ण पक्षी पाहायला मिळतात.

4/5
जालना शहराला पाणीपुरवठा करणारे घाणेवाडी जलाशय देखील अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतं. घाणेवाडी तलाव भरलेला असताना या ठिकाणी विविध परदेशी पक्षांचे देखील दर्शन होते. हे पाहण्यासाठी पक्षी प्रेमी नागरिक इथे नेहमीच गर्दी करतात.

5/5
तर जालना शहरापासून 45 किमी अंतरावर असलेल्या शंभू महादेव आणि श्री क्षेत्र नांगरतास येथे देखील अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. पावसाळ्यामध्ये खळखळणारे झरे आणि धबधबे देखील इथे प्रवाहित होतात. अशा पद्धतीने जालना जिल्ह्यातील या पाच पर्यटन स्थळांना तुम्ही सुट्टीच्या दिवशी आवश्यक भेट देऊ शकता.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement