Tips to set curd in Winter: हिवाळ्यात दही बनवण्यात येत आहेत अडचणी, मग वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स आणि घरीच बनवा गोड आणि घट्ट दही
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Winter cooking tips: हिवाळ्यात दही बनवताना काही अडचणींचा सामना करावा लागतो. जशी जशी थंडी वाढू लागते तसतसं दही जमण्यात अनेक अडचणी येतात. कधी दह्यात जास्त पाणी राहून ते पातळ होतं तर कधी ते अजिबातच जमत नाही. जाणून घेऊयात हिवाळ्यात उत्तम दही बनवायच्या काही टिप्स्.
दही हा सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. दही हे उत्तम नैसर्गिक प्रोबायोटीक म्हणून ओळखलं जातं. दही खाल्ल्यामुळे फक्त पोटालाच थंडावा नाही मिळत तर डोकं शांत होऊन मनही ताजंतवानं राहायला मदत होते. त्यामुळे कोणतंही चांगलं काम करण्याला जाण्याआधी चमचाभर दही हातावर देण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वीपासून चालत आली होती.
advertisement
advertisement
हिवाळ्यात दही लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कॅसरोल पद्धतीचा वापर. कॅसरोलची रचना उष्णता टिकवून ठेवण्यासाठी केली जाते ज्यामुळे दूध उबदार राहायला मदत होते. कॅसरोल पद्धतीने दही लावण्यासाठी आधी दूध उकळून घ्या. थोडं थंड झाल्यानंतर त्यात 1-2 चमचे दूध पावडर टाकून ते चांगलं मिसळून घ्या. जर तुम्ही म्हशीचं किंवा फुल क्रीम दूध वापरत असाल तर तुम्हाला दूध पावडर टाकण्याची गरज नाहीये. यानंतर या दुधात 1 चमचा दही टाकून पुन्हा दूध व्यवस्थित ढवळून घ्या. ज्या भांड्यात तुम्हाल दही बनवायचं आहे त्या भांड्यात हे दूध ओतून त्यावर झाकण ठेऊन द्या.
advertisement
advertisement
हिवाळ्यात थंड तापमानामुळे दही तयार होण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येतो. त्यामुळे दह्याचं भांड उबदार रहावं म्हणून दह्याच्या भांड्याभोवती कापड गुंडाळून ठेवायची पद्धत होती. जेणेकरून उबदारपणा वाढून लवकर दही तयार होईल. उन्हाळ्यात दही तयार व्हायला फक्त फक्त 5-7 पुरेसे असतात. मात्र हिवाळ्यात दही तयार होण्यासाठी 12 तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
advertisement
उत्तम दही तयार होण्यासाठी दुधाचं तापमान योग्य असणं गरजेचं आहे. दूध खूप थंड किंवा खूप गरम असेल तर दही तयार होण्यात अडचणी येतील. त्यामुळे दूध उकळवल्यानंतर ते पूर्ण थंड होण्याची वाट पाहू नका. दूध कोमट असताना त्यात एक चमचा दही टाका. दूध व्यवस्थित ढवळून घ्या. त्यामुळे योग्य पद्धतीने दही जमायला मदत होईल.
advertisement
हिवाळ्यात ओव्हनमध्ये दही बनवणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पण यासाठी तुम्हाला ओव्हन फ्रेंडली किंवा मातीचं भाडं वापरावं लागेल. कोमट दूध मातीच्या भांड्यात घ्या. त्यात दही टाकून ते नीट ढवळून घ्या. यानंतर त्याला फॉइल पेपरने झाकून 80 डिग्री टेपरेचर सेट करून ३० मिनिटं गरम करा. 30 मिनिटानंतर फॉईल पेपर काढून दही गोठलंय की नाही हे तपासून ते भांडं फ्रिजमध्ये ठेवा.
advertisement
ऐकून आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे. हिवाळ्यात दही बनवण्यासाठी तुम्ही मिरची वापर करू शकता. आधी दूध व्यवस्थित गरम करून घ्या. ते कोमट झाल्यानंतर त्यात 1 चमचा दही टाकून दूध व्यवस्थित ढवळून घ्या. एक हिरवी मिरची धुवून ते कपड्याने पुसून दुधात टाका. मिरचीचं देठ व्यवस्थित असेल याची खात्री करा. दुधाच्या भांड्याला धक्का लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. उत्तमरितीने दही जमून येईल.


