Gen Z चा राजकारणात ठसा, 22 वर्षीय सिद्धी झाली भाजपच्या तिकीटावर नगरसेवक!

Last Updated:
भारतीय जनता पार्टीच्या 22 वर्षीय उमेदवार सिद्धी शिळीमकर यांच्या विजयाने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या तरुण वयात नगरसेवकपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सिद्धी शिळीमकर यांनी विकास, पारदर्शकता आणि नागरिकांचा थेट सहभाग या मुद्द्यांवर निवडणूक लढवली आणि त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
1/5
पुणे काल जाहीर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. या निवडणुकीत जनरेशन झेडमधील तरुणांनी प्रभावी कामगिरी करत मतदारांचा विश्वास संपादन केला असून, भारतीय जनता पार्टीच्या 22 वर्षीय उमेदवार सिद्धी शिळीमकर यांच्या विजयाने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या तरुण वयात नगरसेवकपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सिद्धी शिळीमकर यांनी विकास, पारदर्शकता आणि नागरिकांचा थेट सहभाग या मुद्द्यांवर निवडणूक लढवली आणि त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

advertisement
2/5
मुकुंदनगर भागातील प्रभाग क्रमांक 21 मधून निवडणूक लढवलेल्या सिद्धी शिळीमकर या प्रॉडक्ट (उत्पादन) डिझाइनमध्ये पदवीधर आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेली नियोजनाची आणि नाविन्यपूर्ण विचारांची शिस्त त्या महापालिकेच्या कारभारात आणण्याचा त्यांचा मानस आहे. निर्णयप्रक्रिया आणि खर्चाची सविस्तर माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देत पूर्ण पारदर्शकतेचा कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. नागरिकांनी विचारलेला प्रत्येक प्रश्न सार्वजनिक मंचावर उत्तरला जाईल, असे त्या सांगतात.

3/5
त्यांच्या विकास अजेंड्यात नियमित नागरिक बैठका, 24 तास स्वच्छ पाणीपुरवठा, कार्यक्षम कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा, पर्यावरण जागरूकता वाढवणे आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. विशेषतः तरुणांसाठी कौशल्य विकास, स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि महिलांसाठी सुरक्षित आणि सक्षम सार्वजनिक सुविधा उभारण्यावर त्यांचा भर आहे.

4/5
सिद्धी शिळीमकर यांना राजकीय पार्श्वभूमीचीही साथ लाभली आहे. त्यांच्या आई यापूर्वी नगरसेवक होत्या, तर वडील गेली 25 वर्षे भारतीय जनता पार्टीसोबत सक्रियपणे काम करत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीपलीकडे जाऊन स्वतःच्या कामातून वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्धार सिद्धी यांनी व्यक्त केला आहे.

5/5
जनरेशन झेडचे मुद्दे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि पारदर्शक प्रशासन या त्रिसूत्रीवर आधारित कामकाजातून त्या शहराच्या विकासात नवा दृष्टिकोन आणतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. आता या अपेक्षांना त्या कसे पूर्ण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement