Buttermilk: ताक पिण्याचे शरीराला फायदेच फायदे, पण पावसाळ्यातही प्यावं का?

Last Updated:
Buttermilk: नेहमीच्या आहारात ताक हे पेय अतिशय उपयुक्त मानलं जातं. उन्हाळ्यामध्ये शरीराचा दाह कमी करण्यासाठी थंडगार ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, पावसाळ्यात ताक प्यावे की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
1/5
पावसाळ्यात वातावरणात ओलावा निर्माण होऊन विषाणूंची वाढ झालेली असते. अशा वातावरणात सर्दी, खोकला, पचनाच्या तक्रारी, त्वचाविकार यांसारख्या समस्या डोकं वर काढतात. या काळात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. अनेकांना असा प्रश्न सतावतो की पावसाळ्यात ताक पिणं आरोग्यासाठी योग्य आहे का? याबद्दल आरोग्य तज्ज्ञ स्नेहा परांजपे यांनी माहिती दिली आहे.

advertisement
2/5
ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक असल्याने त्यात लॅक्टोबॅसिलस सारखे चांगले जंतू असतात. हे जंतू पचनतंत्र सुधारतात आणि बद्धकोष्ठता, अपचनासारख्या तक्रारी दूर करतात. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फरस, इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेकजण वजन नियंत्रित रहावं म्हणून देखील ताक पितात.

3/5
पावसाळ्यातील दमट हवामानात शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत ताक शरीरात योग्य प्रमाणात द्रव टिकवून ठेवण्यास मदत करते. ताक हे थंड प्रभाव देणारं असल्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहते. ताकातील बॅक्टेरिया आणि अन्नघटक हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात, असं आरोग्य तज्ज्ञ स्नेहा परांजपे सांगतात.

4/5
पावसाळ्यात ताक पिण्याचे काही तोटे देखील आहेत. दमट हवामानात ताक लवकर आंबट होते आणि अशा स्थितीत ते पिऊन पोट बिघडण्याचा धोका असतो. ताक थंड प्रवृत्तीचं असल्यामुळे आधीपासूनच सर्दी-खोकल्याची तक्रार असल्यास ते टाळावं.

5/5
रात्रीच्या वेळी ताक पिणे शरीरासाठी अयोग्य ठरू शकतं. त्यामुळे सकाळी किंवा दुपारीच त्याचं सेवन उत्तम ठरते. योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य प्रकारे सेवन केल्यास पावसाळ्यात ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेषतः जर तुम्हाला पचनाची तक्रार नसेल, सर्दी-खोकला नसेल तर तुम्ही नक्कीच ताकाचा आहारात समावेश करू शकता, असं आरोग्य तज्ज्ञ स्नेहा परांजपे सांगतात.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement