advertisement

नाईलाज! लपून बसला जावई, मित्रांनी केला दगा; गावकऱ्यांनी काढली गाढवावरून मिरवणूक, जपली परंपरा

Last Updated:
सुरेश जाधव, बीड : बीडमध्ये जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. जवळपास गेल्या 100 वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जाते.
1/5
सर्वत्र धुळवडीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, बीडमध्ये जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. जवळपास गेल्या 100 वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जाते. जावयाला गाढवावर बसवून त्याला हार घालून गावातून मिरवणूक काढण्यात येते.

2/5
बीडच्या केज तालुक्यात विडा गावात ही परंपरा आहे. लग्नात घोड्यावरून वरात घेऊन येणाऱ्या जावयाला धुळवडीच्या दिवशी मिळणारा हा मान नको वाटत असला तरी परंपरा म्हणून स्वीकारावा लागतो. यावेळचा मान शिंदी गावचे संतोष नवनाथ जाधव यांना मिळालाय.

3/5
जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी ही परंपरा सुरू केली. विशेष म्हणजे विडा गावात दीडशेहून अधिक घरजावई आहेत. धुळवडीच्या दोन दिवस आधी गाढवावरून मिरवणुकीसाठी जावई शोधण्याची मोहिम सुरू होते. अनेक जावई यातून निसटतात. जो जावई सापडतो त्याची गाढवावरून मिरवणूक काढली जाते.

4/5
जावयाला मारुतीच्या मंदिराजवळ नवीन कपड्यांचा आहेर दिला जातो. तसंच एकदा गाढवावरून मिरवणूक काढली की त्याला पुन्हा यासाठी निवडले जात नाही.

5/5
यंदा गाढवावरून मिरवणूक काढण्यात आलेल्या जावयाने म्हटलं की, मी लपून बसलो होतो पण पाच सहा जण आले. एकटा माणूस काय करणार, सापडलो. मित्रांनी मी कुठे आहे ते सांगितलं. आता नाइलाज आहे. मजबुरी असल्यानं बसावं लागतंय, बसायची इच्छा नव्हती असंही यंदा मान मिळालेल्या जावयाने म्हटलं.

BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement