advertisement

Buldhana News : सायकल खेळताना ट्रकखाली आला; बुलढाण्यात चिमुकल्याचा भयानक अंत, पाहा PHOTO

Last Updated:
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात अपघातात एका 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. (राहुल खंडारे, प्रतिनिधी)
1/5
बुलढाणा शहरातील इकबाल चौकात ट्रकच्या चाकाखाली येऊन 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. स्मशानभूमीकडे जात असलेल्या ट्रकच्या मागच्या चाकात सायकल खेळणारा अकरा वर्षीय गजानन नामक मुलगा अडकला. या अपघातात चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

2/5
गजानन विजय घोडे असं मृत बालकाचे नाव असून तो जोहर नगर भागातील रहिवाशी आहे. घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी मोठा तणाव देखील निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठत तणावावर नियंत्रण मिळवून ट्रक चालकाला आपल्या ताब्यात घेतले आहे.

3/5
मिळालेल्या माहितीनुसार, जनता चौक ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले असल्यामुळे दिवसातून कित्येक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते. वाहनांच्या या गर्दीमुळे अनेकदा अपघाताची स्थिती निर्माण होते.

4/5
आज झालेला अपघात अतिक्रमणाचाच परिणाम असून या अतिक्रमणामुळे मुलाचा बळी गेला असल्याची चर्चा जनता चौकात ऐकायला मिळाली. जिल्ह्यात मागील आठ दिवसांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

5/5
भरदिवाळीत हा अपघात घडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्ते अपघात आणि त्यावरील दुचाकी अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement