advertisement

Marathwada Weather: हाडं गोठवणारी थंडी! मराठवाड्याचा पारा घसरला, गुरुवारी हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather update: उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. मराठवाड्यातील नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
1/5
उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मराठवाड्यात देखील दिवसेंदिवस गारठा वाढत आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा 13 नोव्हेंबर रोजीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज 13 नोव्हेंबर रोजी हवेतील आर्द्रता कमी होण्याची शक्यता आहे. वातावरण अधिक कोरडे होणार असून छत्रपती संभाजीनगरचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असू शकते. दिवसा ऊन आणि रात्रीच्या वेळी चांगलाच गारवा जाणवेल. तसेच आकाश पूर्णपणे निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

3/5
जालना, बीड, आणि लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः हवामान कोरडे राहणार आहे. तसेच निरभ्र आकाश राहणार असून तापमानातील घट कायम असण्याची शक्यता आहे. यावेळी या तीनही जिल्ह्यांचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहू शकते.

4/5
मराठवाड्यातील उर्वरित परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात देखील गारवा वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी या जिल्ह्यांमध्ये दुपारी ऊन तर संध्याकाळी गारवा निर्माण झाला होता. मात्र आता हवामानात बदल जाणवत असल्याने कडाक्याचा गारठा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

5/5
एकंदरीत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सातत्याने तापमान कमी होत असल्याने नागरिकांसाठी इशारा देण्यात आला आहे. 48 तास अनेक भागांमध्ये रात्रीचे तापमान घसरण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement