Weather Alert: पाऊस गेला, पण मराठवाड्यावर नवं संकट, अचानक बदलली हवा, IMD कडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून मराठवाड्यावर नवं संकट आलंय. छ. संभाजीनगरसह या जिल्ह्यांत कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत जाणवत आहे.
1/5
महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत पावसाचा जोर राहिला. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. यंदा मराठवाड्याला पावसाने झोडपले आहे. आता पावसाने माघार घेतली असून अचानक हवापालट झाली आहे. आज शनिवारी छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत हवामान आणि तापमानाची स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत पावसाचा जोर राहिला. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. यंदा मराठवाड्याला पावसाने झोडपले आहे. आता पावसाने माघार घेतली असून अचानक हवापालट झाली आहे. आज शनिवारी छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत हवामान आणि तापमानाची स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
advertisement
2/5
राज्यात हवापालट होऊन गारव्यात वाढ झाली असल्याचे पहायला मिळत आहे. तर मराठवाड्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यात शनिवारी कोरडं हवामान पहायला मिळेल. स्वच्छ सुर्य प्रकाश आणि निरभ्र आकाश राहिल. तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरेल.
राज्यात हवापालट होऊन गारव्यात वाढ झाली असल्याचे पहायला मिळत आहे. तर मराठवाड्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांत शनिवारी कोरडे हवामान पहायला मिळेल. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश राहील. तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरेल.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात थंडीची लाट पहायला मिळेल. या दोन्ही जिल्हात किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात थंडीची लाट पहायला मिळेल. या दोन्ही जिल्ह्यांत किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/5
नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमानात 32 अंश सेल्सिअस इतके राहिल. परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात ही कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 14 अंश सेल्सिअस असेल.
नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतके राहील. परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातही कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 14 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
5/5
दरम्यान, गारवा वाढल्याने मराठवाड्यात शेकोट्या पेटण्यास सुरूवात झाली आहे. तसेच नागरिक गरम कपडे परिधान करत आहेत. वातावरणातील अचानक बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गारवा वाढल्याने मराठवाड्यात शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. तसेच नागरिक गरम कपडे परिधान करत आहेत. वातावरणातील अचानक बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement