Marathwada Rain: प्रतीक्षा संपणार, पाऊस झोडपणार, मराठवाड्यात 24 तासांत हवापालट, या जिल्ह्यांना अलर्ट!

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र, 24 तासानंतर पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
1/5
मराठवाड्यात मागील काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या आठही जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी राहणार आहे.

advertisement
2/5
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत सकाळपासूनच आभाळावर ढगांची गर्दी दिसून येतेय. काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे, मात्र मुसळधार पावसाची शक्यता नाही. ढगाळ हवामानामुळे उन्हाची तीव्रता कमी असून वातावरणात आल्हाददायक गारवा आहे. आज कमाल तापमान सरासरी 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असून रात्रीचे तापमान 24 अंशांपर्यंत खाली येईल.

3/5
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत 24 तासानतंर हवापालट होणार असून 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. 48 तासांसाठी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

4/5
मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यांची किंवा विजांच्या कडकडाटाची शक्यता फारशी नसल्यामुळे शेतकरी आपली शेतीची कामे निर्धास्तपणे करू शकतात. ज्या शेतकऱ्यांची पेरणी रखडलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी पेरणी, फवारणी आणि मशागत योग्य वेळी पूर्ण करण्याची संधी आहे. शहरांतील नागरिकांनाही आज घराबाहेरील कामे किंवा प्रवास सुरळीत पार पाडता येणार आहे.

5/5
हवामान खात्याने पुढील दोन दिवसांमध्ये काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून पिकांची योग्य काळजी घ्यावी. हवामानात अचानक बदल होऊ शकतात, म्हणून नियमित अपडेटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement