Weather Alert: सावधान! पुढील 72 तास महत्त्वाचे, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
पुढील दोन दिवसांपर्यंत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे शेती, वीजपुरवठा आणि स्थानिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
10 मे रोजी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे (40-50 किमी/तास) आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या हवामानामुळे उभ्या पिकांचे नुकसान, वीजपुरवठ्यात अडथळे, तसेच कच्च्या घरांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी परिपक्व पिकांची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, तसेच तरुण फळझाडांना आधार द्यावा असे सल्ले दिले आहेत.
advertisement
11 मे रोजीही मराठवाड्यातील हवामानात फारसा बदल अपेक्षित नाही. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. या हवामानामुळे शेती, वीजपुरवठा आणि स्थानिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, तसेच तरुण फळझाडांना आधार द्यावा असे सल्ले दिले आहेत. 12 मे रोजीही मराठवाड्यातील हवामानात फारसा बदल अपेक्षित नाही.
advertisement
वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. या हवामानामुळे शेती, वीजपुरवठा आणि स्थानिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी तसेच तरुण फळझाडांना आधार द्यावा असे सल्ले दिले आहेत. या हवामान बदलामुळे मराठवाड्यातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.
advertisement
वादळी वाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी उंच झाडांखाली थांबू नये, विजांच्या कडकडाटाच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत तसेच पाण्याच्या स्त्रोतांपासून दूर राहावे. शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी तसेच तरुण फळझाडांना आधार द्यावा. या उपाययोजनांमुळे संभाव्य नुकसान टाळता येईल.


