Marathwada Rain: मराठवाड्यात हवापालट! आज मुसळधार पाऊस की उघडीप, पाहा 20 ऑगस्टचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत.
1/5
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात देखील पावसाने कहर केला असून काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 20 ऑगस्टचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठाड्यातील हवामानात आजपासून मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून असणारा पावसाचा जोर ओसरणार आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, हवामान विभागाने आज सतर्कतेचा कोणताही इशारा दिलेला नाही.

3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज साधारणतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहील. जालना, परभणी आणि बीडमध्ये देखील हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

4/5
धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यातही साधारणतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील. या चारही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

5/5
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने उघडीप घेतली आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार असून पावसाचा जोर ओसरणार आहे. 21 ऑगस्टपासून पुढील 4 दिवस मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement