1 वर्षांपूर्वी सुरु केला कुक्कुटपालन व्यवसाय,17 हजार पक्ष्यांची देखभाल, महिन्याकाठी होतीय 6 लाखांची उलाढाल
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
- Published by:News18 Marathi
Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातील जवळा निजाम येथील तौकीर मुल्ला यांनी एक वर्षापुर्वी शिफा इसी पोल्ट्री फार्म नावाने कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
advertisement
advertisement
advertisement
केवळ 35 दिवस या पक्षांना सांभाळले जाते. तौकीर मुल्ला यांनी या पक्ष्यांच्या देखभालीसाठी दोन कामगार नियुक्त केले आहेत. ते कामगार या पक्षांची देखभाल करतात. 35 दिवसानंतर पक्षांची पूर्ण वाढ झाल्यानंतर या पक्ष्यांची विक्री केली जाते. तौकीर यांनी एका खाजगी कंपनीसोबत करार केला आहे. त्यातून सदरील कंपनी त्यांना फीड, मेडिसिन आणि पक्षांची पिल्ले पोहोच करते.
advertisement
advertisement








