महाराष्ट्रातलं असं हे शुद्ध शाकाहारी गाव; चिकन-मटणाचं एकही नाही दुकान! PHOTOS
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या ज्योतिबाच्या वाडी गावाला एक वेगळाच इतिहास आहे. या गावात मांसाहार केला जात नाही.
महाराष्ट्रात अनेकजण शुद्ध शाकाहारी असल्याचं आपल्याला माहितीच असेल. पण एखादं आख्खं गावच शुद्ध शाकाहारी आहे, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात असं एक गाव आहे. जिथल्या चुलींवर कधीच मटण शिजलं नाही. तसेच गावातील कुणीही मांसाहार करत नाही. याच भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी या गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
श्री ज्योतिबाचं देवस्थान असलेल्या या गावात दरवर्षी ज्योतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रा उत्सवाला धाराशिवसह लातूर, बीड, सोलापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून मोठी गर्दी होत असते. मात्र, हे गाव अद्यापही विकासापासून वंचित आहे. गावात पुरेशा सोयीसुविधांचा अभाव असल्याची तक्रारही गावकरी करतात.