advertisement

5 तासांत 8000 रुपयांची दरवाढ, जळगावच्या सराफ मार्केटमध्ये होळीआधीच खळबळ

Last Updated:
जळगावमध्ये सोन्याचा दर १ लाख ६३ हजार ७७० आणि चांदीचा २ लाख ७८ हजार १०० रुपयांवर पोहोचला; दरवाढीमुळे ग्राहकांनी खरेदी थांबवली, गुंतवणूकदारांची गर्दी.
1/5
जळगाव प्रतिनिधी, नितीन नांदूरकर: देशाची सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये आज सोन्या-चांदीच्या दरांनी नवा इतिहास रचला आहे. गेल्या काही दिवसांपासूनच्या चढ-उतारानंतर आज बाजारात मोठी खळबळ उडाली. सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली असताना, चांदीने मात्र तब्बल ८ हजार रुपयांची दरवाढ अवघ्या 5 तासांमध्ये झाली आहे.

2/5
विकेण्डआधी झालेली ही दरवाढ ग्राहकांसाठी मोठा धक्का आहे. होळी-गुढीपाडव्याला सोन्या चांदीची खरेदी केली जाते. मात्र ही दरवाढ चांगलीच महागात पडणार असून ग्राहक पाठ फिरवतील अशी शक्यता आहे.

3/5
जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला. जीएसटीसह सोन्याचा दर आता १ लाख ६३ हजार ७७० रुपयांवर पोहोचला. चांदीसाठी आता प्रति किलोमागे २ लाख ७८ हजार १०० रुपये मोजावे लागणार आहेत.

4/5
सराफ व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली तेजी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरलेली किंमत यामुळे ही दरवाढ झाली आहे. तसेच, सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा सोन्या-चांदीकडे वाढल्याने बाजारात ही मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

5/5
लग्नाचा सीझन तोंडावर असताना झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. अनेकांनी आपली खरेदी काही काळासाठी पुढे ढकलली आहे. दुसरीकडे, सोन्या-चांदीचे भाव अजून वाढतील या अपेक्षेने मोठ्या गुंतवणूकदारांची मात्र सराफ कट्ट्यावर गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement